मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 31/12/2025 :
काही लोकांना आपल्या श्रीमंतीचा, देखणेपणाचा, बुद्धिमत्तेचा किंवा सामाजिक संपर्काचा खूपच अभिमान असतो. त्याचे रूपांतर अहंकारात होते व ते स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजू लागतात.
मात्र काही लोकांच्याकडे यातले काहीच नसते. नीट बोलण्याची अक्कल सुद्धा नसते पण भाव तर असे मारतात जसे की त्यांच्या इतके हुशार कोणीच नाही. इतर लोक त्यांची टर उडवतात पण तेही त्यांना समजत नाही.
अशा लोकांचा त्यांच्या आसपास वावरणाऱ्या घरातील, नात्यातील किंवा मैत्रीतील लोकांना त्रास होतो. त्यांच्या फुकटच्या भाव खाण्याचा व शहाणपणा करून बोलण्याचा मानसिक त्रास होतो.
आजचा संकल्प
जे नाही ते दाखवणे, बढाई मारणे, स्वतःला श्रेष्ठ व दुसऱ्यांना कस्पटासमान समजणे ही सर्व वाईट स्वभावाची लक्षणे आहेत. त्यापासून आपण दूर राहू व यशस्वी जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या