"रत्नत्रय दिनदर्शिका 2026" चे प्रकाशन संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 31/12/2025 :
रत्नत्रय पतसंस्था करित असलेले कार्य कौतुकास्पद आहे. रत्नत्रय पतसंस्था सामाजिक बांधिलकी जपत विविध कामे सदाशिवनगर व पंचक्रोशीत करीत असल्यामुळे ही पतसंस्था आदर्श पतसंस्था ठरली आहे असे प्रतिसाद सोलापूर जनता सहकारी बँक माळशिरस शाखा चे शाखा अधिकारी सागर बनगे यांनी केले. त्यांच्या शुभ हस्ते रत्नत्रय दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन करण्यात आले त्यावेळेस त्यांनी रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्याचा गौरव करून संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी रत्नत्रय पतसंस्थेचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी, चेअरमन व सदाशिवनगर ग्रामपंचायतचे सरपंच
विरकुमार दोशी, कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी, संचालक जगदीश राजमाने, सुरेश गांधी, अजय गांधी, रामदास गोफणे, सोमनाथ राऊत, विलास साळुंखे, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्ण,सुरेश धाईंजे, वसंत ढगे चंद्रकांत तोरणे, रत्नत्रय इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ देसाई, आयटीआय कॉलेज दहिगावचे मुख्याध्यापक जगताप, हांगे, माने, पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत व संस्थेचे कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल मांडवे या ठिकाणी प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात बोलताना प्रमोद दोशी म्हणाले की संस्था ऑनलाईन व्यवहार करीत आहे संस्थेमार्फत सभासदांना डीडी काढणे, आरटीआय, आरटीजीएस, एन एफ टी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, यूपीआय च्या माध्यमातून पैसे भरणे व काढणे तसेच क्यूआर कोड पेमेंट अशा विविध ऑनलाईन सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरविल्या असल्यामुळे व्यवहार सुरळीत चालू आहेत. या पतसंस्थेची स्थापना 2004 मध्ये परिसरातील छोट्या व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे त्यांची उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आली असून या संस्थेच्या प्रगतीस सर्व सभासद, ठेवीदार, ठेविदार संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे. आर्थिक व्यवहारा बरोबर ही संस्था अनेक सामाजिक कार्य करून समाज सेवासुद्धा करीत आहे. गेली 21 वर्ष रत्नत्रय पतसंस्था ही दरवर्षी दिनदर्शिका काढत असते तसेच सर्व जाहिरातदारांच्या सहकार्याने दिनदर्शिका निघत आहे. असेच प्रेम संस्थेवर राहावे त्याबद्दल सर्व जाहिरात दारांचे आभार संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी यांनी मानले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन विरकुमार दोशी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी संस्थेचे कर्मचारी हेमंत कुलकर्णी, वैभव मोडासे, मंगेश जगताप, विक्रम पालवे, युवराज वळकुंदे यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या