मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 13/11/2025 :
दैनंदिन जीवनात वावरताना प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतात. कोणी त्या प्रामाणिकपणे मान्य करतात. त्या दुरुस्त करण्याचाही प्रयत्न करतात.
मात्र काहींचा स्वभाव असा असतो की मान्य करणे दूरच उलट दुसऱ्याच्या माथी खापर
फोडतात. ही खापर फोडण्याची सवय लागली तर स्वतःमध्ये काहीच बदल होत नाही उलट दुसऱ्यांना दोष देऊन स्वतः नामानिराळे राहतात.
वैयक्तिक, सामाजिक, राजकीय सर्व ठिकाणी हे पहायला मिळते. पूर्वीचे काही तरी उकरून काढायचे आणि आत्ता हयात नसलेल्या व्यक्तींच्यावर आत्ताच्या परिस्थितीचे खापर फोडायचे. काय साधते यामधून?
आजचा संकल्प
आजच्या परिस्थितीला कदाचित मागील काही व्यक्ती किंवा परिस्थिती जबाबदार असली तरी सध्या त्यामधून मार्ग काढणे महत्वाचे हे लक्षात घेऊ व विनाकारणचा वाद टाळू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
===================

0 टिप्पण्या