कुछ तो लोग कहेंगे
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 08/11/2025 :
“कुछ तो लोग कहेंगे” हे गाणं मला खूप प्रेरणा देतं. जेव्हा कुणी माझ्याबद्दल काही बोलतं, टीका करतं किंवा नावं ठेवतं, तेव्हा मी हे गाणं ऐकते आणि मला योग्य वाटतं तेच करते.
गाढव, वडील आणि मुलगा या गोष्टीप्रमाणे—
काहीही केलं तरी लोक बोलणारच.
कुणी चांगलं बोलेल, तर कुणी नावं ठेवेल.
म्हणूनच म्हटलं आहे, “निंदकाचे घर असावे शेजारी.”
काहीही करा—कुणीतरी काहीतरी बोलणारच.
कुणी नावाजेल, कुणी नावं ठेवेल;
कुणी तोंडावर गोड बोलेल आणि मागे मात्र आपली मापं काढेल.
कुणाला आपलं म्हणणं पटतं, कुणाला नाही.
काही लोक योग्य सल्ला देतात, तर काही सल्ला देतच नाहीत.
काही जण चुकीची गोष्ट दिसूनही गप्प राहतात आणि फक्त मजा पाहतात.
स्वतः काहीच करत नाहीत, पण इतरांचे यश पाहून जळतात.
आणि जे काहीतरी करत राहतात, त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतात.
पण असं जग चालतंच;
म्हणून आपण जगणं थांबवायचं का? नाही!
लोकांच्या बोलण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायचं
आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते करत राहायचं.
आणि हेही खरं आहे की—
सगळेच लोक जळतात किंवा टीका करतात असं नाही.
काही लोक आपल्याला मनापासून नावाजतात,
आपल्याबद्दल चांगले विचार ठेवतात,
आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात.
असे लोक कमी असतात, पण लाखात एक असतात.
अशा लोकांच्या संपर्कात राहणं खूप महत्त्वाचं असतं.
✍️@ सौ.धनश्री म्हेत्रस पुणे
---

0 टिप्पण्या