मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 16/11/2025 :
दैनंदिन जीवनात अनेकदा आपल्याला अनपेक्षित गोष्टींना सामोरे जावे लागते. गोष्टी कधी मनासारख्या घडतात. कधी कल्पना पण केली नव्हती इतक्या चांगल्या घडतात तर कधी खूपच वाईट व धक्कादायक गोष्टींना सामोरे जावे लागते.
अशा वेळेस आपण गोंधळून जातो. प्रमाणापेक्षा जास्त आनंदी होतो किंवा अगदीच खचून जातो. दुःखद प्रसंग असेल किंवा अपघात झाला असेल तर माझ्याच बाबतीत असे का म्हणून शोक करतो.
खरे तर अशा वेळेस जे समोर आले ते शांत मनाने स्वीकारण्याची मानसिक तयारी हवी. यातून बाहेर कसे पडता येईल याचा विचार केला पाहिजे. इतर व्यक्तींना मानसिक आधार देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.
आजचा संकल्प
आपल्यावर जो कोणता प्रसंग येईल त्याला संयमाने व प्रसंगावधान राखून सामोरे जाऊ व दुःख असो वा आनंद स्थिर मनाने स्वीकारू._
सौ. स्नेहलता स. जगताप.
======================

0 टिप्पण्या