मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 18/11/2025 :
रोजच्या जीवनात वेळोवेळी सत्य-असत्य यांचा सामना करावा लागतो. आपण कितीही प्रामाणिकपणे काम करत असलो तरी संपर्कात येणारी समोरची व्यक्ती नेहमीच आपल्याशी सत्यतेने वागेल असे नसते.
कोणी आपल्याशी ठरवून किंवा अनाहुत पणे खोटेपणाने वागले तर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होतो. कितीही जवळची असली तरी त्या व्यक्तीची संगत सोडविशी वाटते पण जवळची व प्रिय व्यक्ती असल्याने ते पण अवघड वाटते.
खरे तर सत्य ते सत्य. सत्याचा मार्ग अनुसरत असताना सोबत कमी लोक असतील तरी ठीक. जास्त लोकांच्या संगतीत राहण्यासाठी असत्याची संगत कधीच योग्य नाही.
आजचा संकल्प
नीतिमत्ता पायदळी तुडवून खोटेपणाने वागणाऱ्या लोकांच्या घोळक्यात असण्या पेक्षा सत्याची कास धरून "एकला चलो रे" करावे लागले तरी चालेल पण प्रामाणिकपणे जीवन जगू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
+++++++++++++++++++++

0 टिप्पण्या