💢 युवकाच्या खून प्रकरणातील तीन आरोपींच्या अकलूज पोलीसांनी आवळल्या मुसक्या 🔵 चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश

 

💢 युवकाच्या खून प्रकरणातील तीन आरोपींच्या अकलूज पोलीसांनी आवळल्या मुसक्या

🔵 चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाचा आदेश 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 03/11/2025 :

फिरायला जाण्यासाठी मोटारसायकल दिली नाही या किरकोळ कारणावरून मेघराज युवराज हिलाल (वय २१ वर्षे),रा.काझी गल्ली,अकलूज या युवकाचा तिघांनी निरा नदीच्या पाण्यात बुडवुन खुन केल्याचे अकलूज पोलीसांनी केलेल्या तपासात निष्पण झाले असून, सदर घटनेतील तीनही आरोपींना पोलीसांनी शिताफीने अटक केली 

   याबाबत अकलूज पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार दि. २२/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजताच्या सुमारास अकलूज शहरातील शनी घाट,निरा नदीच्या पात्रामध्ये मेघराज युवराज हिलाल( वय २१ वर्षे), रा.काझी गल्ली,अकलूज या युवकाचा मृतदेह नदीपात्रामध्ये मिळून आला होता. त्यावरून अकलुज पोलीस ठाणेस अपमृत्यु नोंद नं ८०/२०२५ प्रमाणे नोंद करण्यात येवुन सदर मयताची चौकशी पो.हे.कॉं. अमोल बकाल करीत होते.

पुढील तपासाबाबत पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके,अकलुज विभाग यांनी सुचना दिल्या होत्या.सदर चौकशीमध्ये साक्षीदार यांचेकडे तपास,सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रीक तपासाचे आधारे मयत मेघराज युवराज हिलाल याचा मृत्यु हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले. तपासामध्ये आरोपी नामे.१) रोहीत रघुनाथ क्षत्रीय,२) राहूल रघूनाथ क्षत्रीय,३) रोहन सुनिल शिंदे रा. सर्वजण काझी गल्ली, अकलूज यांनी यांनी दिनांक २१/१०/२०२५ रोजी रात्री ११.३० वाजच्या सुमारास मयत युवक व आरोपी यांच्यात वाद झाल्याचे कारणावरून त्यास जबरदस्तीने निरा नदीच्या पात्रामध्ये नेवून पाण्यामध्ये बुडवून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने अकलुज पोलीस ठाणे कडील स.पो.नि. योगेश लंगुटे यांचे नेतृत्वाखाली तपास पथकाने आरोपी १) रोहीत रघुनाथ क्षत्रीय, २) राहूल रघूनाथ क्षत्रीय यांना वाशी जि.धाराशिव या ठिकाणावरून ताब्यात घेतले असुन आरोपी नं ३ रोहन सुनिल शिंदे यास अकलुज येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.

यातील आरोपी यांचेकडे तपास करता त्यांनी  गुन्ह्याची कबुली दिली आहे.सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

  सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे,सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पो.हे.कॉं. अमोल बकाल, पो.हे.कॉं. समीर पठाण,पो.हे.कॉं. शिवकुमार मदभावी,पो.हे.कॉं. विक्रम घाटगे, पो.हे.कॉं. तुषार गाडे, पो.हे.कॉं. कंठोळी,पो कॉं.रणजीत जगताप यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या