विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 18/11/2025 :
सध्या थंडी चांगलीच वाढली आहे. तापमानाचा पारा खाली खाली उतरत आहे. आपण शेकोटी पेटवून ऊब घेतो. चुलीजवळ गर्दी करतो. उबदार कपडे, भरपूर पांघरूण. तरीसुद्धा अंगातील थंडी निघत नाही.
ज्यांना सकाळी शाळेत जावे लागते त्यांना तर सकाळी उठायचे फार जीवावर येते. किती गार लागते ना? कोवळ्या उन्हात बसावेसे वाटते. गरम गरम काही तरी खावे-प्यावे असे वाटते. भूख पण लागते सारखी. होय ना?
मुलांनो, हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने खूप पोषक असतो. तुम्ही जास्तीत जास्त पोषक व चौरस आहार घेतला तर तब्बेत छान सुधारते. अपचनाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे मस्तपैकी बाजरीची भाकरी, पौष्टिक भाज्या, दूध, लोणी, तूप, सुका मेवा, कडधान्ये जे उपलब्ध असेल ते पोटभर खा. मस्त खा, स्वस्थ रहा.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या