विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 16/11/2025 :

आपल्याला आपले पालक, शिक्षक नेहमी  "मोठी स्वप्ने पहा" असे सांगत असतात. रात्रीची झोपेतील स्वप्ने नव्हे तर तुमच्या भवितव्याच्या दृष्टीने दिवसा स्वप्ने पहा, व ती पूर्ण करण्याची जिद्द ठेवा.

तुमचे जे ध्येय असेल ते टप्प्या टप्प्याने पूर्ण करा. त्याचे नियोजन करा. त्यासाठी आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक असते. आपण पूर्णतेचा ध्यास घेतला तर ध्येय आपल्या दृष्टीपथात येते.

मुलांनो, "थोडे वेडे व्हा" असे जे म्हटले जाते ते खरेच आहे. आपण ध्येय पूर्ण करण्यासाठी वेड्यासारखे प्रयत्न केले तर हमखास यश मिळते.

योग्य दिशेने, नियोजन करून भरपूर प्रयत्न करा व घवघवीत यश मिळवा.


सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या