🔰 राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सदाशिवराव माने विद्यालय, अकलूजचा डंका – दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
🔵 सार्थक काळे व अस्मिता काळे पाटील यांचे सुवर्णपदक; सुजल धडांबे याचे रौप्यपदक
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 14/11/2025 :
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी मनमाड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदकावर आपले नाव कोरले. या तिघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होऊन अकलूजचा आणि विद्यालयाचा गौरव वाढवला आहे.
या स्पर्धेत विद्यालयाचा खेळाडू चि. सार्थक मिलिंद काळे याने 108 किलो स्नॅच आणि 135 किलो क्लीन अँड जर्क, असे एकूण 243 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक (Gold Medal ) पटकावला. त्याची अरुणाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तसेच विद्यालयाची विद्यार्थिनी कु. अस्मिता काशलिंग काळे पाटील हिने 19 वर्षांखालील 86 किलो वजन गटात 48 किलो स्नॅच आणि 58 किलो क्लीन अँड जर्क, असे एकूण 106 किलो वजन उचलून प्रथम क्रमांक (Gold Medal ) मिळवला. तिची संभाजीनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याच स्पर्धेत विद्यालयातील सुजल नानासो धडांबे याने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळवले. अशा प्रकारे तीन विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवून सदाशिवराव माने विद्यालयाने राज्यस्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, सभापती सयाजीराजे मोहिते-पाटील, सर्व संचालक मंडळ सदस्य, प्रशाला समिती, संस्था सचिव, सहसचिव, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या उज्वल यशाबद्दल मुख्याध्यापक अमोल फुले यांनी 'विद्यार्थ्यांच्या मेहनतीने व प्रशिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाने हे उज्वल यश प्राप्त झाल्याची भावना व्यक्त केली.

0 टिप्पण्या