विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 13/11/2025 :

शालेय जीवनात आपण जे पुस्तकी ज्ञान घेतो त्यावर परीक्षा देतो. परीक्षेतील गुणांवर पुढील प्रवेश, पदवी, पद अवलंबून असते. त्याला अनुसरून पगार असतो. म्हणून विद्यार्थी दशेत आपला प्रयत्न चालू असतो.

खरे तर शालेय जीवनात मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवन जगताना फारसे उपयोगी पडत नाही. तिथे व्यवहारज्ञान असावे लागते. समाजात लोकांशी कसे वागावे, बोलावे, संबंध कसे टिकवावेत हे समजावे लागते.

मुलांनो, दैनंदिन जीवनात तांत्रिक बाबी याव्या लागतात. घरातील वस्तूंची किरकोळ दुरुस्तीची कामे यावी लागतात. व्यवहारात कसे वागावे ते जमावे लागते. 

थोडक्यात जीवन शिक्षण महत्वाचे आहे. अभ्यासासोबत ते धडे पण घ्या.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या