🔵 गिरीश प्रभाकर शेटे, कासिम अब्दुलरज्जाक तांबोळी व बाळासाहेब अण्णासाहेब मगर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश 🟡 कासिम तांबोळी यांची काँग्रेस मधून उमेदवारी

🔵 कासिम अब्दुलरज्जाक तांबोळी व

बाळासाहेब अण्णासाहेब मगर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

🟡 गिरीश  प्रभाकर शेटे, कासिम तांबोळी यांची काँग्रेस मधून उमेदवारी

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 17/11/2025 :

राष्ट्रवादी काँग्रेस चे कासिम अब्दुलरज्जाक तांबोळी ( माजी सदस्य, ग्रामपंचायत अकलूज) व बाळासाहेब अण्णासाहेब मगर (मगराचे निमगाव ) यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


गांधी चौक ते माळशिरस रोड अकलूज येथील शेटे व्यापारी संकुल मधील माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी संपर्क कार्यालयात औपचारिक आणि साध्या पद्धतीने संपन्न झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्या हस्ते तांबोळी आणि मगर यांना पक्ष चिन्हांकित टोपी आणि ओढणी  सन्मानपूर्वक प्रदान करून त्यांचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, सोलापूर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष  बाळासाहेब आप्पासाहेब मगर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, तालुका उपाध्यक्ष संभाजी गोविंद साठे, तालुका उपाध्यक्ष रमेश अंकुश नामदास, तालुका सरचिटणीस धनाजी श्रीपती मस्के, सद्दाम कासिम तांबोळी, इकबाल तांबोळी शहाजहान शेख, समीर तांबोळी, निलेश जालिंदर पगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांनी नगरसेवक पदासाठी पक्षाच्या वतीने आपले नामनिर्देशन  पत्र दाखल केले. आज सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रीय काँग्रेस तर्फे अकलूज नगरसेवक पदासाठी आपले नामनिर्देशन पत्र वेळेपूर्वी अधिकृतपणे दाखल केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या