🟡 सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांचा सत्कार संपन्न 🔵 आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, अकलूज नगर परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार

 

🟡 सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांचा सत्कार संपन्न

🔵 आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, अकलूज नगर परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 21/10/2025 : राजाभाऊ मारुती गायकवाड बोरगाव (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे यांच्यावतीने मानाची गांधी टोपी, उपरणे आणि पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.

राजाभाऊ गायकवाड यांनी निवड झाल्यानंतर अकलूज येथे माळशिरस तालुका अध्यक्ष गिरीश शेटे यांच्या संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमित अनंतराव करंडे यांचे उपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होऊन त्या बैठकीमध्ये ॲड. कारंडे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला. 

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस ॲड. अमित अनंतराव कारंडे, माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, नॅशनल युनियन ऑफ बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ नवी दिल्ली अर्थात एन यु बी सी चे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, रमेश अंकुश नामदास, अभिजीत प्रभाकर शिवरकर, महादेव सर्जेराव साठे, पत्रकार पंढरी दादा थोरात, रुद्रवंती राजाभाऊ गायकवाड दीपक रामचंद्र वायदंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महत्वपूर्ण बैठकीमध्ये माळशिरस तालुका कार्यकारणी मध्ये इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात चर्चा होऊन विचार विनिमय करण्यात आला. त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती अकलूज नगर परिषद निवडणूक बाबत स्वतंत्रपणे सर्व जागा लढवण्या बाबत चर्चा आणि विचार विनिमय झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या