🟡 ओंकार साखर कारखान्याने मोफत साखर वाटपा द्वारे शेतकरी व कर्मचारी यांची दिवाळी केली गोड 🔵 मोफत साखर वाटपाचा शुभारंभ

🟡 ओंकार साखर कारखान्याने मोफत साखर वाटपा द्वारे शेतकरी व कर्मचारी यांची दिवाळी केली  गोड

🔵 मोफत साखर वाटपाचा शुभारंभ 

वृत्त एकसत्ता न्यूज 
आकाश भाग्यवंत नायकुडे, 
मुंबई दिनांक 19/10/2025 :
ओंकार साखर कारखाना चांदापुरी यांच्यावतीने ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारीवर्ग यांना दिपावली सणासाठी ऊसाच्या टनेज प्रमाणात मोफत साखर वाटप उपक्रमाचा शुभारंभ चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे होते. 
या वेळी बोलताना रामभाऊ मगर म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे पाटील यांनी सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारीवर्ग यांची दिपावली गोङ व्हावी या उदात्त हेतूने दर वर्षी  सणाला मोफत साखर देऊन  सर्वासमोर एक आदर्श निर्माण केला तसेच दिपावली साठी ऊसाचा दुसरा हप्ता 205/- रूपये प्रमाणे बॅकेत जमा केला. बोत्रे पाटील यांच्या  मोफत साखरेच्या  उपक्रमाचे  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करून अभिनंदन केले. 
या वेळी माजी उपसरपंच तात्या चोरमले, चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते, केन मॅनेजर शरद देवकर, समाधन गायकवाङ,   ऊस उत्पादक शेतकरी  महादेव मगर, किसनराव मगर, सर्जेराव पिंगळे, नितीन जाधव, बाळासाहेब मोटे, मोहन मगर, धर्मा बोङरे यासह बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आभार  रमेश औताङे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या