जेष्ठ पत्रकार,संपादक,प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील यांचे निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) दिनांक 11/10/2025 : कोडोली (ता.पन्हाळा) येथील जेष्ठ पत्रकार,साप्ताहिक निर्दोष भारत चे संपादक व प्राचार्य डॉ.विश्वनाथ रंगनाथ पाटील उर्फ कवी पार्वतीरंग यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी शुक्रवारी रात्री यशवंत हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.दैनिक सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीच्या स्थापनेपासून पत्रकार म्हणून त्यांनी कोडोली परिसरात कामाला सुरुवात केली. प्रदीर्घ काळ सकाळमधील सेवेनंतर डॉ.विश्वनाथ पाटील यांनी अकलूज येथे विविध दैनिकात काम केले. अलिकडच्या काळात त्यांनी स्वःताचे साप्ताहिक निर्दोष भारत हे चालू करून त्याचे ते संपादक म्हणून काम करीत होते.कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात त्यांनी अध्यापक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात कामास सुरुवात केली.मध्यतंरी काही वर्षे त्यांनी अकलूज येथील महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. साधारण गेल्या १० वर्षापासून ते कोडोली येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम केले आहे.अकलूज येथे दैनिक सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून परिचित होते.त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

0 टिप्पण्या