🟢 शेतकऱ्यांना तातडीने दर हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी. 🟣 ओला दुष्काळ जाहीर करावा. 🔵 शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावी. 🟡माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने मागण्यांचे निवेदन सादर

 

🟢 शेतकऱ्यांना तातडीने दर हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी.

🟣 ओला दुष्काळ जाहीर करावा.

🔵 शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावी.

🟡माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने  मागण्यांचे निवेदन सादर

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 03/10/2025 : शेतकऱ्यांना तातडीने दर हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावी इत्यादी मागण्यांचे निवेदन माळशिरस तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने आज (दि.3) माळशिरस तहसीलच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात आले. नायब तहसीलदार यांचेकडे निवेदन सादर करताना माळशिरस तालुका काँग्रेस अध्यक्ष गिरीश प्रभाकर शेटे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आप्पासाहेब मगर,  रमेश नामदास, ॲड. भगवान दामोदर धाईंजे, राहुल कुंभार, डॉ. गिरीश शिंदे, सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र सरकारने अद्याप पर्यंत कोणतीही मदत जाहीर केली नाही. शेतकरी वर्ग संकटात सापडला असून शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आजच्या या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने दर हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी. ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावी. अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाने सातत्याने शासनाकडे केली आहे. परंतु दुर्दैवाने शासन शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप निवेदनामध्ये करण्यात आला असून

शेतकऱ्यावर हे प्रचंड संकट आले असताना सुद्धा केंद्र सरकारचे कोणतेही पथक /प्रतिनिधी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात आलेले नाही. ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे. असे मागण्यांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

शासनाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वरील मागण्यांचे निवेदन माळशिरस तहसील मध्ये देण्यात आले असल्याचे तालुकाध्यक्ष गिरीश शेटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या