🔵 "ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हावे" - शितलदेवी मोहिते पाटील 🟢 नवोद्योजकांसाठी यावर्षीही होणार अभ्यास दौऱ्याचे आयोजन

🔵 "ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हावे" - शितलदेवी मोहिते पाटील

🟢 नवोद्योजकांसाठी यावर्षीही होणार अभ्यास दौऱ्याचे आयोजन  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 24/10/2025 : "ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हावे" असे मत सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

खासदार नवोद्योजक विकास कार्यक्रमांतर्गत गतवर्षीचा अभ्यास दौरा, प्रशिक्षण व कार्यशाळा अत्यंत यशस्वी झाली असून यावर्षीही गुजरात येथे अभ्यासदौरा होणार असल्याची माहिती शिवरत्नच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यांनी 'शिवराई वाडा" शंकरनगर येथे दिली.

खासदार नवोद्योजक कार्यक्रमांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिवरत्नचे कार्यालयीन अधीक्षक अश्रफ शेख उपस्थित होते.

शितलदेवी मोहिते पाटील पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील तरुणांनी नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हावे, उद्योजक व्हावे या हेतूने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरत्न नॉलेज सिटी, शिवामृत या संस्थांच्या माध्यमातून खासदार नवोदयोजक कार्यक्रमांतर्गत गतवर्षी गांधीनगर गुजरात येथील अभ्यासदौरा आयोजित केला होता या दौऱ्यात सुमारे शंभर तरुण नवउद्योजक व उद्योजक यांना संधी देण्यात आली होती. अभ्यास दौऱ्यातील बहुतांश तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरू केले असून त्यापैकी २१ उद्योजकांनी नविन व्यवसाय यशस्वीरीत्या सुरु आहेत.तर जुन्या १३ उद्योजकांनी अभ्यास दौऱ्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग वाढविला आहे. उद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेत व प्रशिक्षणात एक हजार चौवीस लोकांना मार्गदर्शन मिळाले आहे. ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक होण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक मशिनरी, मार्केटिंग, पॅकेजिंग यासारख्या गोष्टींची माहिती अभ्यास दौऱ्यात मिळत असून यावर्षी डिसेंबर महिन्यात गुजरात येथे अभ्यास दौरा आयोजित केला जाणार आहे. अभ्यास दौऱ्यात सहभागासाठी पात्रता परीक्षा व मुलाखत घेण्यात येणार असून याबाबतची सर्व माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या