दिपवाळी निमित्त संग्रामसिंह वि. का. सोसायटी बिजवडी यांच्या वतीने सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 18/10/2025 : दिपवाळी निमित्त संग्रामसिंह विविध कार्यकारी सोसायटी बिजवडी यांच्या वतीने सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जेष्ठ सभासद लक्ष्मण पवार हे होते. डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था अनेक वर्षापासून चालत आहे.
लाभांश वाटप प्रसंगी संस्थेचे चेअरमन पोपट यादव, व्हॉइस चेअरमन बालाजी शिंदे, बलभीम शिंदे, भागवत करांडे, आप्पा खरात, ज्ञानदेव खरात, गणेश कदम, लालासाहेब यादव, शिवाजी पवार, बाळासो पवार, बाबासाहेब पवार, शशिकांत शिंदे, दादासाहेब शिंदे, दत्तात्रय रासकर, भागवत करांडे, गणेश कदम, भारत खरात, तानाजी मोटे, दिनकर पवार, उमेश यादव, दत्ता खरात इत्यादी सभासद उपस्थित होते.

0 टिप्पण्या