💢श्री शंकर स. सा. का. लि. चा 53 वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ संपन्न
🟪 यंदा 4 लाख में.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवण्यात आले
✒️ कर्मचाऱ्यांना पगार वाढ व दिपावली सणां निमित्त 15 दिवसाचा पगार बोनस देण्याचे जाहिर
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 17/10/2025 :
श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर चा 53 वा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील , सौ. नंदिनीदेवी मोहिते - पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद आमदार तथा श्री. शंकर सहकारी चे चेअरमन रणजितसिंह मोहिते - पाटील उपस्थित होते. यानिमित्त श्री शंकर कारखान्याचे संचालक दादासाहेब वाघमोडे पाटील व त्याच्या सुविद्य पत्नी सौ शोभा वाघमोडे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली.
कै. सहकार महर्षि काकासाहेब, आक्कासाहेब व कै. पपा साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी श्री शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, माजी जि. प. उपाध्यक्ष शहाजीराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते - पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील सौ. सत्याप्रभादेवी मोहिते - पाटील, सौ. शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते पाटील,संचालक ,आप्पासाहेब रूपनवर,मालोजीराजे देशमुख, दत्तात्रय रणनवरे, प्रफुल्ल कुलकर्णी, प्रताप सालगुडे, शिवाजी गोरे, ॲड सुरेश पाटील,महादेव शिंदे, रामदास कर्णे, कुमार पाटील, सुनिल माने, सचीन लोकरे, सुधाकर पोळ, बाळासाहेब माने, दत्तात्रय मिसाळ, संजय कोरटकर, दत्ता चव्हाण, जगन्नाथ जाधव,विरकुमार दोशी, उदय धाईजे, विलास फडतरे, विलास आद्रट, अभिमान सांवत, शिवाजी जाधव, शिवाराज निबाळकर, दत्ता भोसले, ज्ञानदेव निबाळकर, तुकाराम चव्हाण, भोजराज माने, बिनु पाटील, नाना शेंडे उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी कर्मचाऱ्यांना पगार वाढ व दिपावली सणां निमित्त 15 दिवसाचा पगार बोनस देण्याचे जाहिर केले. तसेच सभासद कामगार व ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्याने यंदाचा ऊस गळीत हंगाम यशस्वी पणे पार पडेल असा मला विश्वास आहे यंदा 4 लाख में.टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 86032 या जातीचा ऊस जास्तीत जास्त पुरवठा करावा . त्या ऊसाच्या दराबाबत स्वतंत्र्य धोरण ठरविण्यात येईल असे ही ते म्हणाले.
यावेळी कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, डुबल, ॲड. नितिन खराडे, सरपंच, उपसरपंच, ग्रा. सदस्य, शेतकरी सभासद, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व माळशिरस तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या