🟡 विचारधारा


🟡 विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 06/09/2025 :

जीवनात बालपणापासून काही चांगल्या सवयी लावून घ्या. कोणतेही काम करताना असे करा की त्याचा परिणाम चांगला साधला पाहिजे. कार्यपूर्ती नंतर आशीर्वाद मिळाले पाहिजेत. शाब्बासकी मिळाली पाहिजे.

शाळेत वर्गात छान वर्तन ठेवा. चांगले विद्यार्थी बना. काहीतरी चाळे करून शिक्षकांना त्रास देण्यात आनंद मानू नका. शिक्षक हे तुमचे मार्गदर्शक असतात. घरात आई-वडिलांचे ऐका, आज्ञाधारक बना, त्यांना आदर द्या.

तुमचे चांगले वर्तन, मनापासून केलेले अध्ययन यामुळे सर्वांगाने तुमचे व्यक्तिमत्व खुलत रहाते. बौद्धिक, भावनिक, नैतिक विकास होतो. सामाजिक व्यक्तिमत्व घडते. एक चांगला व सुजान नागरिक तयार होतो.

स्वतःला घडवण्यासाठी काही चांगल्या सवयी अंगिकारा, देश घडवा.

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या