🟩 विचारधारा

🟩 विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 18/09/2025 : आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शालेय शिक्षण व शाळाबाह्य संस्कारक्षम शिक्षण महत्वाचे असते. शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेऊन आपण नोकरी-व्यवसायासाठी सक्षम होतो. पण समाजात वावरताना, परस्पर संबंध प्रस्थापित करताना  सामान्यज्ञान व व्यवहारज्ञान गरजेचे असते.

त्यामुळे मुलांनो, फक्त पुस्तकी ज्ञान कामाचे नाही. शिक्षणातून आपले सामाजिक, वैचारिक व भावनिक व्यक्तिमत्व घडले पाहिजे.आपण आपल्या आवडीनुसार व बौद्धिक क्षमतेनुसार योग्य शाखेची निवड करून त्याचा लाभ घेतला पाहिजे.

हल्ली परदेशात जाऊन पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी परदेशगमन करतात. नोकरीनिमित्त तिथेच वास्तव्य करतात. तिकडची सवय लागली की इकडे यायला नको म्हणतात.

मुलांनो, शिका, मोठे व्हा. मात्र आपली माणसे व आपला देश सोडू नका.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या