🅾️ तेव्हा तुमचा फोन बंद पडला होता काय ?
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 21/09/2025 : महाराष्ट्रातील आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या बद्दल काही भाषा वापरली म्हणून टीव्हीवर आदळा आपट सुरू आहे. आमच्या महाराष्ट्राचे जाणते नेते यांनी ताबडतोब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवा भाऊ (आडनाव लिहिलं नाही आणि या आडनावाचा कांही लोकांना त्रास होत आहे) यांना फोन केला व पडळकर यांच्या बद्दल त्यांना आवरा असे सांगितले.
देवा भाऊ एक सभ्यगृहस्थ आहेत. त्यांनी ताबडतोब पडळकरना योग्य त्या सूचना दिल्या.
मला यात शरद पवारांचे कौतुक वाटते. त्यांनी मात्र आपल्या नेत्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्यावर त्वरित फोन केला. पण जसजसा भारतीय जनता पक्षाचा पगडा भारतीय मनावर बसू लागला व 14 साल पासून सत्तेतून बाजूला गेल्यानंतर पवार साहेबांनी किती वेळा जातीवाचक उद्गार काढले आहेत याबद्दल त्यांना कोण फोन करणार?
त्यांच्या पक्षाची एक कार्यकर्ती आरक्षण मागताना भाजपच्या नेत्यांच्या पत्नीबद्दल, आई बद्दल अर्वाच्च भाषा वापरली तर ती थांबवावी असे पवार साहेबांना कधी वाटले नाही.
जरांगे पाटील देवा भाऊंच्या बद्दल त्यांच्या आई बद्दल बोलतो, त्यावेळी पवार साहेबांना फोन करा वाटत नाही. मोदींच्या आई बद्दल वाटेल ते बोलले जाते त्यावेळी पवार साहेबांचे फोन बंद असतात.
14 साल पासून सत्ता गेल्यापासून अनेक महाराष्ट्रातील नेते भ्रमीष्टासारखे बडबडत आहेत. त्यामध्ये संजय राऊत, जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर आहेत. यांना पवार साहेब कधी फोन करत नाहीत. मोदींना औरंगजेब म्हटल्याबद्दल पवार साहेब फोन करत नाहीत. यांना फक्त आपल्या नेते, आपले कार्यकर्ते यांच्या बद्दल बोललेले ऐकू येते व दिसते. मोदी, देवा भाऊ यांच्या घरातील स्त्रियांच्या बद्दल बोललेले यांना ऐकू येत नाही, दिसत नाही.
"अर्वाच्च भाषा आणि खोटारडी भाषा" यामध्ये तुलना करायची झाल्यास एक वेळा अर्वाच्य भाषा चालेल पण खोटी भाषा चालणार नाही. कारण खोटे बोलल्यामुळे समाजात फूट पडत असते.
राजकारणासाठी तेरावा बॉम्बस्फोट केला,160 जागा निवडण्यासाठी भेटण्यास आलेले दोन लोक, ही खोटारडी भाषा पवार साहेबांना चालते. अशी भाषा वापरल्याबद्दल यांना कोणताही भाजप नेता फोन करणार नाही. कारण हे खोटारडे आहेत व सत्ता गेल्यामुळे चलबीचल झालेले आहेत. हे भाजपचे नेते व जनता ओळखत आहे.
यांचे फोन सोयीस्कर रित्या सुरू असतात व बंद पडतात.
आपल्या नेत्याबद्दल बोलल्यावर त्यांच्या नाकाला मिरच्या झोबंतात. पण हिंदू धर्म ,हिंदू संस्कृती, संकष्टीला मटण ,नवरात्रातील मासे हे याना दिसत नाही व ऐकू येत नाही.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी.
[पडळकर साहेब ज्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत बोलत जा असा सल्ला देणे अयोग्यच.]
#############

0 टिप्पण्या