🟢 मनाची शुद्धता


🟢 मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 06/09/2025 :

अनेकदा आपण भरपूर वाचन करतो, किंवा बरेच काही ऐकतो पण काय वाचले किंवा ऐकले ते लक्षातच रहात नाही. खूप आठवण्याचा प्रयत्न केला तरी सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात.

विद्यार्थीदशेत अगदी असाच अनुभव. भरपूर अभ्यास, जागरण करून पाठांतर पण पेपर लिहिताना पूर्ण ब्लँक. याचा अर्थ स्मरणशक्ती कमी आहे असे नाही तर ज्यावेळी अभ्यास केला होता त्यावेळी आपले पूर्ण लक्ष तिथे नव्हते.

यासाठी लिहिताना, वाचताना किंवा पाठांतर करताना मन तिथे हवे. जे करतोय तिथे, वर्तमानात आपण मनाने हजर असणे महत्वाचे असते. मनाच्या कप्प्यात त्या गोष्टी ठसल्या की विसरल्या जात नाहीत.

आजचा संकल्प

दैनंदिन जीवनात आपण जे काम करत आहोत त्यामध्ये मनापासून सहभागी होऊ. मन एकाग्र करून ती गोष्ट करू म्हणजे ती सदैव स्मरणात राहतील.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या