♦️प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वाद, विठ्ठल राजे पवार यांचा मुख्यमंत्र्यांकडे कारवाईचा आग्रह ⭕ हेकडी उतरवताच उद्धट प्रभारी साखर आयुक्ताने अखेर केबिन मीटिंग मधून काढला पळ


♦️प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वाद, विठ्ठल राजे पवार यांचा मुख्यमंत्र्यांकडे कारवाईचा आग्रह

⭕ हेकडी उतरवताच उद्धट प्रभारी साखर आयुक्ताने अखेर केबिन मीटिंग मधून काढला पळ

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 24/09/2025 : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित एफआरपी (Fair and Remunerative Price) आणि इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी साखर आयुक्तालयात पोहोचलेल्या शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांच्याकडून गैरवर्तनाचा आणि असंवेदनशील प्रतिसादाचा सामना करावा लागला. या घटनेनंतर  शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी  तावरे यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांची तात्काळ दोन्ही पदावरून बदलीची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना लेखी तक्रार केली आहे.

काय आहे प्रकरण?

शेतकरी संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करत आहे. यामध्ये प्रामुख्याने २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी उसाला प्रति टन किमान ₹४३०० दर मिळावा, रिकव्हरी बेस रेट ९% असावा, तसेच शेतकऱ्यांची २२ ते २४ हजार कोटी रुपयांची प्रलंबित एफआरपी तातडीने मिळावी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र "ऊस उत्पादक शेतकरी महामंडळ," ''कृषी किंमत न्यायाधीकरण" स्थापन करावे, तसेच 'सहकारी साखर कारखाना अर्थिक संकटे, व 'शेतकऱ्यांची थकीत देणी, 'एफ आर पी, 'आर एस एफ, आणि 'रिकवरी मधील प्रचंड अर्थिक गैरप्रकारांमुळे, गेल्या 'दहा वर्षापासून FRP चे गैर व्यवहारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दहा ते बारा हजार कोटी रुपये कमी मिळतात, या संदर्भात उच्चस्तरीय बैठक लावण्याची मागणी ५ मे २०२५ मध्ये करण्यात आली होती, सदर बाबत  त्यांनी कोणताही पत्रव्यवहार केला नसल्यामुळे जाब विचारण्यात आला, या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी ५ मे २०२५ रोजी संघटनेने तत्कालीन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन दिले होते. त्यावेळी १५ दिवसांत उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय कळवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज सुमारे साडेचार महिन्यांनंतरही यावर कोणतीही कारवाई न झाल्याने संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बुधवारी (२४ सप्टेंबर) प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांना भेटण्यासाठी गेले.

शिष्टमंडळात राष्ट्रीय अध्यक्षांसोबत राष्ट्रीय उपाध्यक्षा ऍड. डॉ. भारती चव्हाण, पुणे शहर जिल्हा युवा अध्यक्ष अनिल भांडवलकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. चर्चे दरम्यान, प्रभारी आयुक्त तावरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अनाकलनीय आणि असंवेदनशील भूमिका घेतली, तुम्हाला झेपत नसेल तर खुर्ची सोडून द्या आणि महिला पदाधिकारी व पत्रकारांसी असंसदीय भाषा वापरल्याने तावरे यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील केली.

अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

चर्चेच्या सुरुवातीलाच, दीपक तावरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल अनभिज्ञता दर्शवत "मला यातलं काहीच माहिती नाही, तुम्ही संबंधितांकडे जा" असे उद्धटपणे सांगितले. यावर संतप्त झालेल्या विठ्ठल राजे पवार यांनी "मग साखर आयुक्तालय कशासाठी आहे?" असा जाब विचारला. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या या कार्यालयाची दप्तर दिरंगाई आणि कर्तव्यशून्यता यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी, चर्चेचे छायाचित्रण करण्यास सुरुवात झाल्यावर तावरे यांनी लगेचच आक्षेप घेतला. याच दरम्यान, राष्ट्रीय महिला वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. भारती चव्हाण यांच्याशी त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन गैरवर्तन केले. त्यांनी डॉ. चव्हाण यांना "गेट आऊट फ्रॉम हिअर" असे अपमानजनक शब्द वापरले. एका महिलेशी, त्यातही संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याशी अशा पद्धतीने बोलल्याने शिष्टमंडळात प्रचंड संताप व्यक्त झाला.

विठ्ठल राजे पवार यांनी यावर लगेचच तावरे यांना फैलावर घेतले आणि "एका महिलेशी अशी असंसदीय भाषा कशी वापरता येते?" असा प्रश्न विचारला. त्यांनी पुढे म्हटले की, "एका राष्ट्रीय पातळीच्या अध्यक्षांसमोर कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा करणे आणि पत्रकारांशी अरे-तुरेने बोलणे हे एका आयएएस अधिकाऱ्याला शोभणारे नाही."

आरोप-प्रत्यारोप आणि पलायन

[साखर आयुक्तालयातील या गैरवर्तनानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार खडाजंगी झाली. जेव्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तावरे यांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल जाब विचारला, तेव्हा त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही आणि चर्चेतून पळ काढण्याचा प्रयत्न केला, ते बैठक सोडून पळून गेले. त्यांच्या या कृतीमुळे हा वाद आणखी वाढला. हा प्रकार संपूर्णपणे असहकार आणि असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.] 

मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

या घटनेनंतर विठ्ठल राजे पवार यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल आणि मेसेजद्वारे तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी प्रभारी आयुक्त तावरे यांच्यावर दप्तर दिरंगाई, कर्तव्यच्युती आणि महिला प्रतिनिधींच्या अवमानाचा आरोप केला आहे. त्यांनी तावरे यांची तातडीने बदली करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"हा माणूस सहकार आणि कृषी क्षेत्राच्या कोणत्याही पदासाठी योग्य नाही. असा बिनकामाचा माणूस सहकाराचे वाटोळे करेल," असे पवार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यासोबतच, डॉ. भारती चव्हाण यांच्या अवमान प्रकरणी तावरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

संघटनेचे योगदान

या भेटीदरम्यान, विठ्ठल राजे पवार यांनी संघटनेने केलेल्या कामांची माहितीही दिली. त्यांनी सांगितले की, संघटनेच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील २०० सहकारी साखर कारखान्यांवरील २५ हजार कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स वसुली अरे साखर कारखानदारीतला सहकार वाचवला. केंद्र सरकारनेही यावर सकारात्मक निर्णय घेतला. संघटना शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थाना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना, असे अधिकारी सहकार क्षेत्रालाच धोका देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

थकीत एफआरपी आणि आर.आर.सी.चे प्रकरण

याच बैठकीत विठ्ठल राजे पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागील हंगामातील सुमारे २२ ते २४ हजार कोटी रुपयांच्या थकीत एफआरपी, आर एस एफ चा मुद्दाही उपस्थित केला. तसेच, पंढरपूर येथील साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराबाबतही त्यांना पत्र, माहिती दिली आहे,. पण प्रभारी आयुक्तांनी या सर्व गंभीर विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भविष्यातील पावले

या प्रकरणावर सरकार तातडीने लक्ष देईल अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. प्रमोटेड आय.ए.एस्. अधिकारी  दीपक तावरे यांनी जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जाईल, नाही तर संघटना पुढील काळात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही विठ्ठल राजे पवार यांनी दिला आहे. त्यांनी जय किसानचा नारा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या