🛑 तुम्हारी भी जय हो | हमारी भी जय हो || ना तुम्ह हारे | ना हम हारे||
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 05/09/2025 :
1966 साली. राज कपूरचा "दिवाना" नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यामध्ये हे वरील गीत होते व ते त्याकाळी फार गाजले होते. गेल्या आठ पंधरा दिवस मराठा आंदोलन, आरक्षण ,फडणवीसाचा राजीनामा वगैरे प्रकरण महाराष्ट्रभर जोरात सुरू होते याकरिता मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत येऊन त्यांनी मुंबई ठप्प केली होती. सरकारात फडणवीस सोडून चिंतेचे वातावरण होते. पण अखेर ज्याचा शेवट गोड ते सर्व गोड या न्यायाने आंदोलन संपले आंदोलक आपल्या आपल्या गावी परत गेले सरकारी ही जिंकले व आंदोलकही जिंकले. त्यामुळे या लेखाचे नाव मी तुम्हारी भी जय हो हमारी भी जय हो असे लिहले.
सरकार पण जिंकले व आंदोलक पण जिंकले मग हारले कोण ना कोणतरी हारले पाहिजे ना. हा युद्धातील नियम आहे. या सर्व लढाईत हारले कोण तर महाराष्ट्रातील चाय बिस्कुट पत्रकार. महाराष्ट्राला पत्रकारितेचा अतिशय भव्य दिव्य इतिहास आहे अनेक आंदोलने व सत्तांतरे पत्रकारांच्या मुळे झाली आहेत. हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील प्रिंट मीडिया मेन स्ट्रीम मीडिया व सोशल मीडिया यावर उल्लू पत्रकारांनी धिंगाणा घातला होता. भगवे वादळ मुंबई घुसणार फडणवीस यांच्या खुर्ची खाली बॉम्ब लागला आहे कोणत्याही क्षणाला युतीमध्ये फूट पडणार व फडणवीस यांना घरी जावे लागणार फडणवीस भाजप व काही अंशी ब्राह्मण समाज याबद्दल वाटेल ते बोललेले प्रसिद्ध करण्यात आले अगदी अनेकांच्या आया बहिणी काढल्या गेल्या अनेकांच्य पार्श्वभागात बांबू घातले गेले मतदार संघात फिरणे अशक्य केले जाईल अशा घोषणा केल्या व हे सर्व खरे आहे अशी लाचार पत्रकारिता जोरात सुरू झाली इतकेच नव्हे फडणवीस यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना आता फडणवीस जाणार व मुख्यमंत्र्यापदाची लॉटरी पुन्हा लागणार असे दिवा स्वप्न पडू लागले जो तो या पत्रकारितेच्या खोट्या भूल थापाना बळी पडून स्वप्नरंजन करू लागला.
पण झाले काय ना सरकार हरले ना आंदोलन हारले या नवीन जीआर चा काय परिणाम आहे हे कळायला अजून सहा-सात महिने लागतील तोपर्यंत तरी आंदोलन व आंदोलन जीवी मागे पडले आहेत. पण पण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याला नावाजले जाते ती पत्रकारीता उल्लू आहे, विकली गेली आहे हे सिद्ध झाले. कोणत्याही पत्रकाराचा कोणताही अंदाज खरा ठरला नाही या सर्व लढाईत हरली ती चाय बिस्कीट पत्रकारिता.
आंदोलक व सरकार ना तूम हारे.ना हम हारे असे आनंदाने म्हणत आहेत पण हे कमअक्कल पत्रकार हरलेले आहेत हे नक्की.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

0 टिप्पण्या