🛑 "आंदोलनाची भिंत उभी करणारा योद्धा, लोकनायक बच्चू कडू"
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 22/09/2025 :
[शेतकरी कर्जमुक्ती व शेतमल गॅरंटी एम एम एस पी बेस रेट कायदा, या मागणीसाठी 28 ऑक्टोबर 2025 ला लाखोंच्या संख्येने चलो नागपूर...]
राज्याने देशभर नव्हे तर जागतिक पातळीवर आंदोलनाला नेऊन ठेवलेली तीन जबरदस्त महाराष्ट्रातील मराठी व्यक्तिमत्व, अत्यंत मोठ्या उंचीची राहिले. त्याच्यात सर्वप्रथम श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये 17 दिवसाचं रेल्वे बंद शेतकरी आंदोलन हे हे जगाच्या लक्षात राहील असे आंदोलन झालं. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली एक त्या काळामध्ये पाच लाख महिलांचे महा अधिवेशन झाले, त्यानंतर दीर्घ कालखंडानडामध्ये सन 2001-02-,ते 13 -14 पर्यंत माहिती अधिकार अधिनियम पासून ते 11 कायदे निर्माण करणारे जेष्ठ समाजसेवक माननीय नामदार अण्णासाहेब हजारे यांच्या नेतृत्वामध्ये दीर्घकाळ प्रचंड मोठे आंदोलन झाली., आणि तिसऱ्या क्रमांकाचे जागतिक रेकॉर्ड ब्रेक, इतिहास आणि आंदोलनातील आंदोलकांची संख्या ही जगभरातला इतिहास घडला कोट्यावधी एकच समाज एकाच ठिकाणी एकाच वेळेवर एकाच व्यक्तीच्या तेही अत्यंत सामान्य वरील दोघांपैकी ही व्यक्ती ही अत्यंत सामान्य आहे त्यांचं नाव आहे ते म्हणजे प्रचंड आत्मविश्वासाने आंदोलन छेडणारा युवक योद्धा शेतकरी' विक्रमवीर आंदोलक माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील हे होय, व आणि त्यानंतर 2000 पासून ते स्वतःच्या बळावर प्रहार हे एक सामान्य संघटन उभारून गोरगरीब ग्रामीण आदिवासी शेतकरी गोरगरिबांची रुग्णसेवक दिव्यांग अपंग संघटना करणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणजे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे बेलोरा या गावातून अमरावती जिल्ह्यातून येतात त्यांनी सलग चार वेळा मोठ्या मताधिक्क्याने स्वतंत्र अपक्ष आमदार म्हणून लढले आणि निवडून आला दरम्यानच्या काळात त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षाची स्थापना करून त्यांनी प्रहार दिव्यांग संघटना प्रहार शेतकरी संघटना प्रहार या नावाने अनेक संघटना स्थापन करून अत्यंत सामान्य आणि शेतकरी कुटुंबातून आलेला चौथा आंदोलक, तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा या व सुभाषचंद्र बोस यां पराक्रमी योद्धाच्या घोषवाक्यावर त्यांनी प्रहार ही संघटना सुरू केली आणि प्रत्येक आंदोलन करताना रक्तदान करून आंदोलनाला सुरुवात केली. तेही इतर कोणाचेही रक्त न घेता स्वतःचे शरीरातले आजपर्यंत जवळपास 110 हून अधिक वेळा त्यांनी रक्तदान केलं आहे आणि त्यांनी जी प्रहार ही संघटना महाराष्ट्र राज्यात उभी केलेली आहे. त्याचे संपूर्ण श्रेय हे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना जाते, बच्चु भाऊ हे प्रहार म्हटले तर 'अपना भिडू बच्चू कडू, हे एक एवढं जबरदस्त सामीकरण निर्माण झालेल आहे की, शोले मधील गब्बरसिंगच्या डायलॉगच्या धास्तीने जसं गाव घाबरायचं तसं बच्चू कडूचे आंदोलन म्हणलं की मंत्रिमंडळच नव्हे तर शासन प्रशासन देखील खडबडून जागं होतं असा हा प्रचंड धाडसी नेतृत्व करणारा प्रहार चा नेता क्रांतिवीर या सिनेमा आणि अनिल कपूरचा एक दिवसाचा मुख्यमंत्री साहेब या चित्रपटामुळे मोठ्या ताकतीने निर्माण झाला, आज ह्या महाराष्ट्र राज्यातला सर्वात ताकतवान छोट्या पक्षाचा मोठा नेता म्हटलं तरी हे वावगे ठरणार नाही आणि हा नेता या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाची क्रांती घडवेल यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. माझ्यासारखा राष्ट्रसेवा दलाचे कुशीत तयार झालेला सामान्य शेतकरी कामगार कार्यकर्ता 46 वर्ष, श्रद्धेय युगपुरुष शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी, जॉर्ज फर्नांडिस शत्रुशल्यजीत भंडारी, विठ्ठल तुपे, भाई वैद्य, अण्णासाहेब पाटील, बापूसाहेब काळदाते, आणि माजी आमदार कुमार सप्तर्षी, यांच्या व शेतकरी कष्टकरी कामगार चळवळीमध्ये काम करत असतानां, तो आज बच्चू कडू यांचे सर्व समावेशक असे शेतकऱ्यांसाठी जीवाची परवा न करणारा शरद जोशी नंतरचा सर्वात खंबीर नेतृत्वाची महाराष्ट्र राज्याला गरज आहे आणि त्यांच्या हाकेला सर्व समविचारी संघटनांच्या माध्यमातून आम्ही मान्य करतो याचाच अर्थ शेतकऱ्यांचे पंचप्राण श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांचे नंतर शेतकऱ्याचा जबरदस्त नेतृत्व करत असणारा ताकतवार नेता कोण असेल तर तो आमदार बच्चू कडू हेच आहेत यात शंका नाही. त्यांच्या कार्य कौशल्य आणि अंध अपंग लेप्रसी शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यासाठी केलेल्या प्रचंड कामानंतर महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांच्या मनामध्ये अधिराज्य करणाऱ्या एक सामान्य नेत्याला लोकांनी दिलेली लोकनायक ही उपाधी बहल करण्यात आली आहे माननीय श्री, बच्चू कडू यांनी सतत केलेल्या शेतकऱ्यांच्या जबरदस्त आणि निर्णयक आंदोलनामुळे ते सतत प्रचंड प्रकाश झोतात आहेत.
एक सामान्य कार्यकर्ता ते अपक्ष आमदार
एक सामान्य कार्यकर्ता ते थेट अपक्ष आमदार...आज त्याचं काम तसेच सन, 2001-02 च्या दरम्यान सातत्याने गोरगरीब दिव्यांग परिवार, शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला आणि विद्यार्थी एखाद्या चौकात जमलेले... त्यांच्या चेहऱ्यावर संताप आणि डोळ्यांत आशा... आणि अचानक एक आवाज घुमतो – “अन्याय सहन करायचा नाही, आंदोलन करायचंच!” तो आवाज कोणाचा तर लोकनायक बच्चू कडू यांची ही *संघर्षातून उभी राहिलेली ओळख.*
*महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले-गेले. पण आंदोलनाला जीवन मानून, अन्यायाविरुद्ध शासन प्रशासन विरुद्ध संपूर्ण ताकतीने लढा देत जनतेच्या मनात घर निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे बच्चू कडू. त्यांनी गेल्या वीस वर्षांपासून २००४ - ते २०२४ पर्यंत महाराष्ट्र विधानसभेत सर्वसामान्य लोकांचे प्रतिनिधित्व केले आहे. आज त्यांच्या पराभवानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत अथवा परिषदेमध्ये हा आवाज ऐकला नाही तर स्मशानभूमीतल्या शांतते सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही तितकंच खरं आहे, तेथे त्यांनी शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार तरुण, महिला आणि उपेक्षित घटकांचे प्रश्न प्रखरपणे मांडले. त्यामुळे त्यांना सामूहिक नेत्यांनी घेरुन त्यांची मतं चोरून सर्वसामान्यांचा आवाज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.! परंतु तो तसा कसाही रोखला जाणार नाही, तेवढी रकब त्यांच्या नेतृत्वात आणि भाषणातील सत्यतेमध्ये आढळते साधेपणा, पण त्याचवेळी सत्ता आणि प्रशासनाला हादरे देणारी ठाम भूमिका. जनतेसाठी लढणारा खरा आवाज म्हणजे बच्चू कडू.*
मंत्री म्हणून उतूंग कामगिरी...
बच्चू कडू यांनी मंत्रीपद मिळाल्यावर त्याचा उपयोग केवळ प्रोटोकॉल आणि पदाच्या गोडीत रमण्यासाठी केला नाही. उलटपक्षी त्यांनी जनतेच्या प्रश्नांना नवी दिशा देण्यासाठी वापर केला. आणि त्यांच्या कारकिर्दीतील भारत देशातला पहिला ऐतिहासिक पाऊल म्हणजे दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना.
ही एक क्रांतीच म्हणावी लागेल.
• भारतात पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय उभारले गेले.
• हजारो दिव्यांग नागरिकांना आपला स्वतंत्र हक्क, आवाज आणि ओळख मिळाली.
• शिक्षण, रोजगार, सुविधा आणि सन्मान या सर्वच क्षेत्रात दिव्यांगांना न्याय मिळवून देण्याचा नवा मार्ग खुला झाला.
ही कामगिरी बच्चू कडू यांना योध्दा आणि दूरदर्शी नेते म्हणून वेगळी ओळख देते.
*आंदोलन म्हणजे चेतावणी.*
*बच्चू कडू यांचे आंदोलन हे फक्त आंदोलन राहत नाही, तर ते बनते सत्तेला दिलेली ठोस चेतावणी.*
• *त्यांच्या एका घोषणेवर हजारो तरुण रस्त्यावर उतरतात.*
• *शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचा संघर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली नवा उन्माद घेतो.*
• *मंत्रालयाच्या भिंती हलवणारी ताकद त्यांच्या प्रत्येक आंदोलनात दिसून येते.*
*त्यांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य जाणवते – ते जे बोलतात, ते करतात. त्यांची चेतावणी म्हणजे घोषणाबाजी नव्हे, तर कृतीची हमी.*
*जनतेचा लोक नायक..*
आज महाराष्ट्राला भाषण करणारे नव्हे, तर संघर्ष करणारे नेते हवेत. बच्चू कडू हे अशा नेत्यांपैकी अग्रस्थानी आहेत. त्यांनी दाखवून दिले की –
• *लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ विधानसभेत भाषण करणारा नव्हे, तर लोकांसाठी रस्त्यावर उतरणारा असतो.*
• *मंत्री म्हणजे प्रोटोकॉलमध्ये अडकणारा नव्हे, तर नवे मंत्रालय निर्माण करून समाजासाठी काम करणारा असतो.*
• *नेता म्हणजे जनतेचा आवाज उचलणारा, अन्यायाविरुद्ध लढा देणारा आणि संघर्षातून आशा निर्माण करणारा असतो.*
*आंदोलनाची भिंत..,*
*बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दिवार घाम, अश्रू आणि विश्वासाने बांधलेली भिंतच आहे.*
• *शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांचे अश्रू,, बेरोजगारांचा आक्रोश, दिव्यांगांचा विश्वास, या सगळ्यांनी ही दिवार घट्ट उभी राहिली आहे. आणि ही दिवार अन्यायाचा कोणताही किल्ला कोसळेपर्यंत तग धरून उभी राहील.*
या सर्वातून निघालेला निष्कर्ष म्हणजे....,
लोकनायक बच्चू कडू हे फक्त एक नेते नाहीत, तर आंदोलनाची दिवार, भिंती उभी करणारे योद्धा आहेत. त्यांनी आपल्या संघर्षातून दाखवून दिले आहे की लोकांचा आवाज जेव्हा आंदोलनातून उठतो, तेव्हा कोणताही अन्याय टिकत नाही.
आज महाराष्ट्राच्या जनतेला त्यांच्या सारख्या लढवय्या नेतृत्वाचीच गरज आहे – जे लोकांसाठी लढतात, जे नव्या पिढीला आशेचा किरण देतात, आणि जे प्रत्येक पावलावर म्हणतात – “अन्याय सहन करायचा नाही, आंदोलन करायचंच!”
सध्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या ताकतीने सर्व जिल्हा तालुका वार सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती, हनी शेतमालाला गॅरंटी एम एस पी बेसरेट हमीभाव कायदा या आंदोलनाच्या निमित्ताने "28 ऑक्टोबर 2025,, रोजी नागपूरला बुटीबोरी,, येथे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा जथा शेतकरी कर्जमुक्ती, आणि सर्व प्रकारच्या शेतमालाला गॅरंटी एम एस पी बेस रेट हमीभाव कायदा या मागणीसाठी, लोकनायक बच्चुभाऊंच्या खंभीर नेतृत्वाखाली नागपूर येथील आंदोलनात राज्यातील सर्व समविचारी संघटना, पक्ष आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार, मेंढपाळ, मच्छीपालक, दिव्यांगाने लाखोच्या संख्येने मा. ना. बच्चू कडू यांनी हाती घेतलेल्या या आंदोलनात सहभागी होतील, आपणही या यांनी आपला हक्क मिळवा, यासाठी शेतकरी हक्क समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने जाहीर निमंत्रण....
जय प्रहार, जय महाराष्ट्र.
जय किसान, जय संविधान.
विठ्ठल राजे पवार
[या लेखाचे लेखक "शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ" संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक आहेत]



0 टिप्पण्या