फुले ,शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोशियनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे यांची नियुक्ती

 

फुले ,शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोशियनच्या  सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे यांची नियुक्ती  ,शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोशियनच्या  सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे यांची नियुक्ती  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 15/09/2025 : फुले ,शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोशियन ( एनजीओ) ठाणे (मुंबई )महाराष्ट्र, या सामाजिक व राज्यस्तरीय शासकीय नोंदणीकृत ट्रस्टच्या सोलापूर  जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार सोमनाथ खंडागळे  यांची फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हिंगोले  यांनी  नियुक्ती केली. महा. शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष तथा  सामाजिक कार्य करणारे  सोमनाथ खंडागळे  यांचे नाव राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सुचविले होते. 

फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन ही शासनमान्य व महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. यामध्ये या फाऊंडेशन कडून आरोग्य सुविधा, औषधी पुरवठा, अपंगत्व असलेल्या व्यक्तींना कृत्रिम हात पाय, खेळोत्तेजक प्रशिक्षणासाठी ५०% भांडवल, युवा बेरोजगारांना विविध रोजगार उपलब्ध, विधवा, तृतीयपंथींना ५०% भांडवल देत व्यवसाय संधी, गोरगरीब शेतकऱ्यांना कृषी साहित्य अवजारे, औषधी यात १०% भांडवल, चालकांना वाहन खरेदीसाठी ५०% भांडवल व २ लाखांचा अपघात विमा, शासन अनुदानित खेळ, प्रशिक्षण, स्पर्धा करीता ५०% भांडवल, कर्जबाजारी गरीब व्यक्तींना ५०% रक्कम फाऊंडेशनतर्फे देत त्यांना पुन्हा व्यवसायात खंबीर करणे अश्या विविध सेवाकार्य ही राज्यस्तरीय फुले शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन संस्था करीत आहे. 

नवनियुक्त अध्यक्ष सोमनाथ खंडागळे  यांनी सांगितले की, आता कोणत्याही गोरगरीब जनता, विधवा महिला, युवा सुशिक्षित बेरोजगार, दिव्यांग व्यक्ती, गरीब शेतकरी व सामान्य व्यापारींना यापुढे त्रास होणार नाही. आणि सदर फाऊंडेशन सातत्याने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आपले सदस्यगण नोंदणी पूर्ण करीत यांचा प्रत्येक सामान्य जनतेला लाभ दिला जाईल असे सांगितले. त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद, तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी यांचे सह सर्व स्तरातून  त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. " आम्हाला आपला अभिमान वाटतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती तून आपण समाजसेवेची ज्योत हाती घेऊन जी वाटचाल करीत आहात, त्या प्रत्येक विधायक कार्यामध्ये आमच्या सदिच्छा सदैव आपणा समवेतआहेत" अशा प्रेरणात्मक शब्द उच्चारत, नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ नवी दिल्ली आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश संपर्क व प्रसिद्धीप्रमुख सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांचे भ्रमणध्वनीवरून विशेष अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या