ऋध्देय युगपुरुष शरद जोशी यांची 90 वी जयंती 3 सप्टेंबर रोजी देशभर साजरी करण्याचे नियोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 02/09/2025 : शरद जोशी विचार मंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन भारत सरकार मान्यताप्राप्त ट्रस्ट शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत श्रद्धेय युगपुरुष शरद जोशी यांची 90 वी जयंती भव्यतेने साजरी करण्यात येणार असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी सांगितले अशी माहिती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी सांगितली.
संघटनेचे राष्ट्रीय कार्यालय 2/467, नाम वैभव किसान शक्ती, कर्नल पार्क, केशवनगर पुणे-411036, महाराष्ट्र राज्य या ठिकाणी प्रमुख कार्यक्रम होईल. त्याचबरोबर भारतामधील 21 राज्यातील संघटना महासंघाचे कार्यालयात 90 ते 100 ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचप्राण ऋध्देय युगपुरुष शरद जोशी यांची जयंती साजरी होत आहे. तरी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. तसेच देशभरातील लाखों शेतकऱ्यांनी आपापल्या घरात ऋध्देय युगपुरुष शरद जोशी यांची 90 वी जयंती साजरी करावी असे जाहीर आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
"आपण आपल्या घरी आपल्या कुटुंबात समावेश सदैव युगपुरुष शरद जोशी यांचा फोटो लावून जयंती साजरी करू शकता आणि त्या साजरी केलेल्या जयंतीचा फोटो माझ्या व्हाट्सअप ग्रुप अथवा 9422517044/8421061164 या नंबर वर पाठवा"- विठ्ठल राजे पवार (अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक, शरदजोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाऊंडेशन, शेतकरी संघटना महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य.)
0 टिप्पण्या