🟢 शेतकरी हक्क कर्जमुक्ती समिती महाराष्ट्र राज्य चा बारामती, इंदापुरात "राज्यातील शेतकरी सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीसाठी" जाहीर मेळावा
🛑 नियोजनाची बैठक 14 सप्टेंबरला बारामतीमध्ये
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 12/09/2025 : बारामती इंदापूर तालुक्याच्या मध्य ठिकाण छत्रपती साखर कारखाना भवानीनगर येथे दिनांक 13/10/2025 रोजी "महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्ती, तसेच शेतमालाला गॅरंटी एम एस पी बेस रेट किंमत मिळावी" या सह इतर प्रमुख मागण्यांसाठी माजी मंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार कैलास पाटील धाराशिव, सतीश काकडे अध्यक्ष शेतकरी कृती समिती, विठ्ठल राजे पवार अध्यक्ष शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ, यांच्या व इतर समविचारी प्रमुख संघटना व पक्ष नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ''शेतकरी हक्क कर्जमुक्त समिती महाराष्ट्र राज्य" च्या वतीने "सामूहिक शेतकरी मेळाव्याचे आयोजन" करण्यात आले आहे.
या सोळाव्या मेळाव्याचे शिस्तबद्ध नियोजन तयारी बैठक रविवार दिनांक १४ सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 ते 3 या दरम्यान, बारामती निरा कॅनॉल सोसायटी, तीन हत्ती चौक भिगवण चौक बारामती येथे मीटिंग व पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यासाठी सर्व शेतकरी संघटना, समविचारी पक्ष संघटना, प्रहार, दिव्यांग संघटना पदाधिकारी, शेतकरी यांना विठ्ठल राजे पवार यांनी सर्वांच्या वतीने आवाहन केले आहे.
या मीटिंग साठी विठ्ठल राजे पवार.(निमंत्रक तथा सदस्य;- शेतकरी कर्जमुक्ती हक्क समिती महाराष्ट्र राज्य)., महेश बडे (संयोजक शेतकरी कर्जमुक्ती हक्क समिती महाराष्ट्र राज्य.) गौरव जाधव.(समन्वय प्रहार जनशक्ती पक्ष.),भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (प्रदेश उपाध्यक्ष व प्रसिद्धीप्रमुख), रवि उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार (प्रदेश युवक अध्यक्ष, युवक विद्यार्थी कामगार आघाडी), मंगेश ढमाळ (अध्यक्ष पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष.) अनिल भांडवलकर.(युवक अध्यक्ष पुणे शहर जिल्हा शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना), अनिल भांडवलकर (युवक अध्यक्ष पुणे शहर जिल्हा), बाळासाहेब वर्पे पाटील (अध्यक्ष पुणे जिल्हा), दत्ता माळशिकरे (कार्याध्यक्ष पुणे जिल्हा), दशरथ एकनाथ माने (अध्यक्ष इंदापूर तालुका), बाळासाहेब चांदगुडे (अध्यक्ष बारामती तालुका), महादेव काजळे पाटील (अध्यक्ष बारामती इंदापूर विभाग), दीपक फाळके (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र), अमोल पिसाळ (युवक अध्यक्ष सातारा जिल्हा), बाळासाहेब मगर( कार्याध्यक्ष पश्चिस म महाराष्ट्र), दत्ता पोंदे पाटील (संपर्कप्रमुख पुणे जिल्हा), अक्षय भापकर (युवक अध्यक्ष बारामती तालुका), संजय महादेव चांदगुडे (संपर्कप्रमुख, शेतकरी, प्रहार अपंग बारामती इंदापूर विभाग) इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी सांगितली.
0 टिप्पण्या