पंढरपूरात पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धेला नागरिक, मंडळांचा उस्फूर्त प्रतिसाद 🟪 पंढरपूर नगरपरिषद व पोलीस प्रशासनातर्फ पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा 💢 116 स्पर्धकांचा सहभाग; मूल्यमापनासाठी तज्ञ परीक्षकांचे 5 पथके


💢 पंढरपूरात पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धेला नागरिक, मंडळांचा  उस्फूर्त प्रतिसाद                                     

🟪 पंढरपूर नगरपरिषद व पोलीस प्रशासनातर्फ पर्यावरणपूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा

💢 116 स्पर्धकांचा  सहभाग;  मूल्यमापनासाठी  तज्ञ परीक्षकांचे 5 पथके

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

पंढरपूर / मुंबई दिनांक 04/09/2025 :

पंढरपूर नगरपरिषद आणि  शहर पोलीस प्रशासन पंढरपूर यांच्या वतीने “पर्यावरण पूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५”  आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेत  महिला भगिनी, गणेश मंडळे, तसेच विविध सामाजिक संस्थांकडून या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याची माहिती  मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच टाकाऊ पासून टिकाऊ, सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर न करता पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर यासाठी मुख्यता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले. 

सजावट स्पर्धेत एकूण 116 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या सर्जनशीलतेला वाव देत अत्यंत आकर्षक, पारंपरिक आणि पर्यावरणपूरक देखावे साकारले. स्पर्धेचे मूल्यमापन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व तज्ञ परीक्षकांचे 5 स्वतंत्र पथके नेमण्यात आली होते. सदर पथकांनी घरोघरी भेटी देत पर्यावरण पूरक मूर्ती आणि सजावट, प्लास्टिक,थर्माकोलमुक्त सजावट, टाकाऊ पासून टिकाऊ, घरगुती कचरा व्यवस्थापन आणि डस्टबिनचा वापर या आधारे गुणांकन करून परीक्षण केले.

या स्पर्धेत जनावरांविषयी माणुसकीचा संदेश देणारा भावनिक देखावा कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीची गोष्ट,  आपल्या प्रथा, परंपरा व संस्कारांना अधोरेखित करणारा. “मराठी सण साजरे करा -आपला पारंपरिक वारसा जपा , भक्ती व समर्पण यांचे दर्शन घडवणारा पांडुरंग भक्त गोरा कुंभाराचा जिवंत देखावा, श्री. विठ्ठल-रुक्मिणी पंढरपूर प्रमुख चार यात्रा पारंपरिक देखावा, केदारेश्वर मंदिर हरिश्चंद्रगड, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा  पारंपरिक वाडे, जीवनशैली, चालीरीती व परंपरा  देखावा, जेजुरीचे खंडोबा मंदिर आदी उल्लेखनीय आणि सामाजिक संदेश देणारे देखावे होते. या उपक्रमासाठी  मुख्याधिकारी महेश रोकडे, प्रशासकीय अधिकारी श्री बोडरे , पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 

        या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत व  विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी श्री रोकडे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या