🟡 विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27/8/2025 : वाजत-गाजत गणपती बाप्पांचे आगमन झाले. सोसायटीचे, मंडळाचे गणपती आले. सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे व्यक्तिमत्व विकास. वर्गणी गोळा करण्यापासून ते विसर्जनानंतर मंडप साफ सफाई पर्यंतचा सहभाग महत्वाचा राहतो.
यामध्ये दररोज संध्याकाळचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे मेजवानी असते. श्रीगणेश कलेचे दैवत असल्याने विविध कलांचे सादरीकरण केले जाते. नृत्य, नाट्य, गायन-वादन, पाककृती वगैरे वैयक्तिक-सामुदायिक आविष्कार सादर केले जातात.
कला सादर करताना देवाचे पावित्र्य जपा. फिल्मी गाण्यावर चित्र-विचित्र नाच करू नका. फालतू विनोद सांगून टाळ्या मिळवू नका. तुमच्या अंगातील कलेला विकसित करा. पालकांना अभिमान वाटेल व पाहणाऱ्यांना आनंद मिळेल अशा कलांचे सादरीकरण करा.
सौ. स्नेहलता स. जगताप
0 टिप्पण्या