✳️ परंपरा जपणाऱ्या पांडुरंग कारखान्याकडून बैलपोळा सणासाठी ऊस बिलाचे वितरण
✅ पोळा सणानिमित्त प्रति मे.टन ₹७५ ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात
❇️ कै.सुधाकरपंत परिचारकांची परंपरा आजही टिकवणारा कारखाना!
🟩 एफआरपीपेक्षा अधिक दर देत शेतकऱ्यांच्या खिशात आनंदाची भर
वृत्त एकसत्ता न्यूज
दत्ता नाईकनवरे / आकाश भाग्यवंत नायकुडे.
श्रीपूर / मुंबई दिनांक 7/8/2025 : श्रीपूर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने बैलपोळ्यानिमित्त स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेली परंपरा आजही जिवंत ठेवत, गळीत हंगाम 2024-25 मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रति मे. टन ₹७५/- प्रमाणे पोळा सणानिमित्त ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, “कारखाना स्थापनेपासून शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून पोळा सणासाठी आर्थिक मदतीचा निर्णय घेतला जातो. ही परंपरा आजही व्यवस्थापन जतन करत आहे.” यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, “गळीत हंगाम 2024-25 मध्ये गाळप झालेल्या ऊसासाठी आज अखेर प्रति मे. टन ₹२७००/- इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. याशिवाय पोळा सणासाठी ₹७५/- प्रति मे.टन बिल शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत ₹२७७५/- प्रति मे. टन असा ऊस दर मिळालेला असून एफआरपीपेक्षा ही रक्कम अधिक आहे.”
येत्या गळीत हंगाम 2025-26 साठी कारखान्याकडे सुमारे १५,००० हेक्टर ऊस नोंदी असून १२ ते १४ लाख मे.टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारखान्याने ऑफ सिझन दरम्यान सर्व दुरुस्ती व कामे पूर्ण केलेली असून, गाळप वेळेत पूर्ण करण्याची तयारी झाली आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले,लक्ष्मण धनवडे भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, सिताराम शिंदे, शामराव साळुंखे, राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या