माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने पिंपरी चिंचवड येथे सर्व धर्मीय वधू वर मेळाव्याचे आयोजन

माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने पिंपरी चिंचवड येथे सर्व धर्मीय वधू वर मेळाव्याचे आयोजन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 3/8/2025 : माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट च्या वतीने पिंपरी चिंचवड पुणे येथे मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत सर्व धर्मीय वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमर चौरे यांनी अकलूज वैभव ला सांगितली.

माता सावित्रीबाई फुले हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे पिंपरी पुणे येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून तृप्ती देसाई (अध्यक्ष माय रमाई फाउंडेशन जयंती महोत्सव 2025) या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मंगल चौरे (संस्थापक सचिव),  राष्ट्रीय पिछडा वर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती एवं अल्पसंख्यांक महासंघ दिल्ली आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संगीता शहा, प्रदेश युवक अध्यक्ष अजय अहिरे, पुणे जिल्हा युवती अध्यक्ष अंजली सरोदे, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भालेराव, कार्यकारी अध्यक्ष सुनिता भालेराव, प्रल्हाद जाधव पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या