🛑 विचारधारा

🛑 विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 15/8/2025 :

🇮🇳 भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳

आज सकाळी उठल्यापासून आपली गडबड असेल. मस्त आवरून शाळेत जायचे. छान रांगेत उभे राहून राष्ट्रध्वजाला कडक सलामी देऊन, खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणताना अंगावर शहारे येतात ना?

क्षणात सर्व स्वातंत्र्यवीरांचा त्याग डोळ्यापुढे येतो. त्यांचे, आपल्या फौजी बांधवांचे शौर्य, धैर्य अन् त्याग नजरेसमोर येतो. आपली मूठ कर्तव्य भावनेने आवळते. जयहिंद म्हणताना आतून उमाळा येतो. कंठ दाटून येतो अन् बलिदान दिलेल्या आपल्या भारतीय बांधवांची कुटुंबे डोळ्यापुढे येतात.

मुलांनो, ही भावना कायम आपल्या उरात ठेवा, त्यांच्यासाठी कृतज्ञ रहा. आपल्या देशासाठी वाहिलेल्या त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत तुम्हाला समजली तर तुम्हाला वेगळे देशप्रेम शिकवण्याची गरज पडणार नाही.

"देश माझा, मी देशाचा" या बाण्याने एकमेकांशी संबंध ठेवून आपला भारत देश इतरांच्यापुढे आदर्श ठरेल यासाठी दक्ष राहू.

जयहिंद!🇮🇳

सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या