शिवभक्त वसंत गणपत बागल यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 17/8/2025 : शेंडगेवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर चे सर्वेसर्वा शिवभक्त वसंत गणपत बागल (वय 65 वर्षे) यांचे शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:38 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. तिसऱ्याचा विधी सोमवार दिनांक 18/8/2025 रोजी सकाळी 7 वाजता शेंडगेवाडी (बागल वस्ती) येथे होईल.
शिवभक्त कै.वसंत गणपत बागल हे शेतकरी कुटुंबातील कष्टाळू आणि मनमिळावू, धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्व होते. "यावेळेस करंज्याला सोमनाथाच्या दर्शनाला जाण्यासाठी आपण पहाटे लवकरच निघूया" असे ते मृत्यूच्या अगोदर दोन दिवसापूर्वी आपल्या थोरल्या मुलास म्हणाले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
0 टिप्पण्या