❇️ दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि. माळीनगरचा 91 व्या ऊस गळीत हंगामासाठी च्या मिल रोलर चे पूजन संपन्न
🟣 पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट - चेअरमन राजेंद्र गिरमे
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 7/8/2025 : देशातील पहिला खाजगी साखर कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळीनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य.) कारखान्याच्या 91 व्या ऊस गळीत हंगामासाठी च्या मिल रोलर चे पूजन पूर्णवेळ संचालक गणेश इनामके यांच्या हस्ते संपन्न झाले.
सन 2025 26 या ऊस गाळप हंगामासाठी उसाचे क्षेत्र व त्यापासून मिळणारे उत्पादन याचा विचार केला असता यंदा आपला कारखाना चार ते साडेचार महिने चालेल. या सीझनसाठी पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व यंत्रणा तयारीत आहे. यंदा उन्हाळ्यामध्ये धरणातील पाण्याची पातळी चांगली होती. त्याचबरोबर राज्यात मान्सून पूर्व पडलेल्या मे महिन्यातील पावसामुळे उसाचे टनेज आणि रिकवरी मध्ये वाढ होईल. गतवर्षीपेक्षा यावेळेस उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. यावर्षी ऊस तोडणी मशीनचा जास्तीत जास्त वापर करून ऊस तोडणी केली जाणार आहे. ऊस तोडणी यंत्रणेला ऍडव्हान्स देऊन करार पूर्तता झाली आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गोपाळराव गिरमे तथा रंजनभाऊ यांनी या मिल रोलर पूजन प्रसंगी बोलताना सांगितली.
याप्रसंगी कारखाना कार्यस्थळावर दुसरे पूर्णवेळ संचालक परेश राऊत, व्हाईस चेअरमन निखिल कुदळे, माजी मॅनेजिंग डायरेक्टर व विद्यमान संचालक सतीश गिरमे, मोहन लांडे, नीलकंठ भोंगळे, विशाल जाधव, राजेंद्र देवकर, शुगरकेन सोसायटीचे व्हाईस चेअरमन कपिल भोंगळे, एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे, संचालक पृथ्वीराज भोंगळे, यांचे सह कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी अनिल बनकर, चीफ इंजिनियर सुरेश जगताप, इलेक्ट्रिक इंजिनिअर अनिल जाधव, मनीष पांढरे, शब्बीर शेख, महेश शिंदे, विराज कुदळे, सचिन कुदळे, पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
0 टिप्पण्या