ओंकार साखर कारखान्याच्या कार्यस्थळी 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 16/8/2025 : ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर भिमराव वाघमोडे होते. बंद असणारा साखर कारखाना चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी चालु करून शेतकऱ्यांच्या ऊसास योग्य भाव दिला. रोजगार निर्मीती झाली. संपुर्ण परिसराचा कायपालट केला. समाजसुधारकांना व क्रांतिकारकांना आभिप्रेत असणारा विकास बोञे पाटील यांनी केला असे याप्रसंगी रामभाऊ मगर यांनी म्हटले.
या वेळी कामगारांना ऊस उत्पादक शेतकरी यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी नितीन जाधव, बापुराव वाघमोङे, ङिसलरी मॅनेजर पी ङी पाटील, चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते, धनाजीराव पवार, मेजर मोहन घोङके, समाधान गायकवाड, पिसे, ज्ञानेश्वर बोङरे यांचेसह सर्व आधिकारी कर्मचारीवर्ग, सुरक्षारक्षक उपस्थित होते आभार रमेश औताङे यांनी मानले.
0 टिप्पण्या