🟪 Bunker Buster System: भारताचे पाकिस्तान, चीनला धडकी भरवणारे पाऊल; अमेरिकेसारखी बंकर-बस्टर प्रणाली विकसित करण्याच्या कामाला गती

🟪 Bunker Buster System: भारताचे पाकिस्तान, चीनला धडकी भरवणारे पाऊल; अमेरिकेसारखी बंकर-बस्टर प्रणाली विकसित करण्याच्या कामाला गती

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 02/07/2025 :

Indian Bunker Buster System: काँक्रीटच्या खाली असलेल्या शत्रूच्या कठीण संरचनांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले हे क्षेपणास्त्र स्फोट होण्यापूर्वी जमिनीखाली ८० ते १०० मीटर आत प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे.

Bunker Buster System Of India: गेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणच्या फोर्डो अणु प्रकल्पावर GBU-57/A ने हवाई हल्ले केल्यानंतर भारत प्रगत बंकर-बस्टर प्रणाली विकसित करण्याच्या कामाला गती देत आहे. अलीकडील काळातील जागतिक संघर्षांपासून धडा घेत, भारत भूमिगत लक्ष्यांना भेदण्यास सक्षम असलेली एक शक्तिशाली नवीन क्षेपणास्त्र प्रणाली तयार करून भविष्यातील युद्धांची तयारी करत आहे. यामुळे भारताची पाकिस्तान आणि चीनसारख्या शेजारी देशांशी सामना करण्याची क्षमता आणखी वाढणार आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) अग्नि-५ आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती विकसित करत आहे. मूळ आवृत्तीपेक्षा याची श्रेणी ५००० किलोमीटरपेक्षा जास्त असून, त्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असेल. ही नवीन आवृत्ती ७५०० किलो वजनाचे बंकर-बस्टर वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम असलेले पारंपरिक शस्त्र असेल.

काँक्रीटच्या खाली असलेल्या शत्रूच्या कठीण संरचनांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले हे क्षेपनास्त्र स्पोट होण्यापूर्वी जमिनीखाली ८०० ते १०० मीटर आता प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे.

यातून असे दिसते की, भारत अमेरिकेच्या लष्करी क्षमतेशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने गेल्या आठवड्यात इराणच्या अणु प्रकल्पांवर हल्ले करण्यासाठी १४ GBU/A, जगातील सर्वात मोठे पारंपरिक बंकर बस्टर बाॅम्ब वापरले होते.

भारताच्या स्वदेशी आवृत्तीचे उद्दिष्ट अमेरिकेच्या क्षमतांपेक्षाही पुढे जाण्याचे आहे.अमेरिकेसारख्या मोठ्या, महागड्या बाॅम्बर्सवर अवलंबून राहण्याऐवजी भारत क्षेपणास्तराद्वारे वितरीत करण्यायोग्य बंकर-बस्टर डिझाइन करत आहे,जे अधिक लवचिक आणि किफायतशीर असतील.

अग्नि-५ च्या दोन नव्या आवृत्त्या विकसित होत असल्याचे वृत्त आहे. त्यापैकी एकामध्ये जमिनीवरील लक्ष्यांसाठी एअरबर् वाॅरहेड असेल. तर दुसरे खोलवर भेदणारे क्षेपणास्त्र असेल, जे जमिनीखालील मजबूत संरचनांमध्ये प्रवेश करण्यासाठी डिझाइन केलेले असेल. यातील प्रत्येक शस्त्राचे वजन आठ टनांपर्यंत असू शकते, ज्यामुळे ते जागतिक स्तरावरील सर्वात शक्तिशाली पारंपरिक शस्त्रांपैकी एक ठरेल.

मूळ अग्नि-५ च्या तुलनेत नवीन आवृत्त्यांमध्ये २५०० किलोमीटरच्या कमी पल्ला असूनही, त्यांच्या विध्वंसक क्षमतेमुळे आणि अचूकतेमुळे ते भारताच्या सामरिक शस्त्रागारात एक शक्तिशाली शस्त्र मानले जाईल.

पाकिस्तान आणि चीनसारख्या शत्रू राष्ट्रांच्या कमांड ॲ॑ड कंट्रोल सेंटर्स, सायलो क्षेपणास्त्र आणि महत्त्वाच्या लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी विशेषतः महत्वाचे ठरतील. या क्षेपणास्त्रांचा वेग मॅक २० दरम्यान असण्याची अपेक्षा आहे , ज्यामुळे ते हायपरसोनिक शस्त्रांच्या श्रेणीत येतील. अशा प्रणाली स्वदेशी पध्दतीने विकसित आणि तैनात करण्याचा भारतचा प्रयत्न, वाढत्या लष्करी क्षमता आणि संरक्षण तंत्रज्ञानत स्वयंपूर्णतेसाठीच्या भारताच्या लष्करी संघर्षासाठीच्या तयारीवर प्रकाश पडतो.सौजन्य : लोकसत्ता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या