💢 महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये नेमकं चाललंय काय? ⚧ नगरसेवकांच्या कुरघोड्यांचा फटका विकास कामांना बसत आहे

 💢 महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये नेमकं चाललंय काय?

⚧ नगरसेवकांच्या कुरघोड्यांचा फटका विकास कामांना बसत आहे

वृत्त एकसत्ता न्यूज 

श्रीपूर, प्रतिनिधी दिनांक 31/7/2025 : महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये सुमारे साडेतेरा कोटींचे विकास कामांचे टेंडर मंजूर होऊन दोन महिने कालावधी होत आहे परंतु कोणत्याही वार्डातील प्रत्यक्षात एकाही विकास कामांचा श्री गणेशा झालेला नाही. या बाबत समजलेली माहिती अशी की नगरपंचायने विकास कामांचे टेंडर संदर्भात जिल्हा दैनिकात नोटीस प्रसिद्ध केली होती त्यानुसार नगरपंचायत कडे चार ते पाच एजन्सीने निविदा भरल्या होत्या. त्यात नगरपंचायतने नमूद केलेल्या नियम अटी शर्ती याचे पुर्णपणे पालन केलेल्या एजन्सी ला टेंडर मंजूर करण्यात आले आहे. त्यातही एकाच एजन्सी ला टेंडर दिलेलं नाही. तीन चार एजन्सी ना ही टेंडर देण्यात आले आहे. यामध्ये टेंडर पास करतांना पारदर्शकता आणण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन टेंडर पास केल्याचे नगरपंचायतचे वरिष्ठांनी माहिती दिली आहे. तरीही कामाचं वाटप कमी जास्त प्रमाणात झाल्याचं कारण देऊन नाराज नगरसेवकांनी विकास कामे टेंडर पास असतानाही काम सुरू केले नसल्याची वस्तुस्थिती पहायला मिळत आहे. या एकंदरीत पार्श्वभूमीवर महाळुंग दोन नंबर गटावरील एका तरुणाने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व स्थितीत आता कामे सुरू होणार की स्थगिती मिळणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या चार वर्षांत नगरपंचायतचे माध्यमातून म्हणावी तशी भरीव व लक्षणीय विकास कामे प्रलंबितच आहेत. निदान आता एक वर्षाच्या राहिलेल्या कालावधीत तरी जनतेला दिलासा देणारी विकास कामे झाली पाहिजेत ही अपेक्षा आहे. नगरपंचायतचे माध्यमातून जनतेला विकास अपेक्षीत आहे मात्र गेल्या चार वर्षांत गटबाजी, कुरघोड्या मतभेद, कामाबाबत अनास्था यामुळे विकास कामे ठप्प आहेत हे नाकारता येणार नाही. स्वच्छता साफसफाई चे कंत्राट गेल्या दोन महिन्यांपासून ठेका मुदत संपल्याने बंद आहे. त्यामुळे सार्वजनिक साफसफाई स्वच्छता यंत्रणा कोलमडली आहे. नगरपंचायतचे चार वर्षांच्या कालावधीत एकही मुख्याधिकारी सहा महिने किंवा एक वर्ष कार्यकाळ पुर्ण करु शकला नाही. त्यामुळे गावाचा कोणताही रचनात्मक विकासात्मक विकास व प्रगती झाली नसल्याचे नागरिकांतून उघड बोलले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या