🔰 राज्यातील शेतकऱ्यांचा २४ जुलै,चे आंदोलनाला जाहीर पाठिंबा, आंदोलन यशस्वी करा. 🟢 संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांना विठ्ठल राजे पवार यांचे जाहीर अवहान

🔰 राज्यातील शेतकऱ्यांचा २४ जुलै,चे आंदोलनाला जाहीर पाठिंबा, आंदोलन यशस्वी करा.

🟢 संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांना विठ्ठल राजे पवार यांचे जाहीर अवहान

वृत्त एकसत्ता न्यूज

पुणे दिनांक 22/7/2025 : 

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सातत्याने सुलतानी आसमानी आणि सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या करत आहे. कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख मे बतायेंगे या भाजपाच्या फसव्या जुमल्याला शेतकरी वैतागलेला आहे.  राज्यात दिवसाला सात ते आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्य सरकार पावसाळी अधिवेशनामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर विधान सभागृहाचा राज्यातील जनतेचा, आणि संविधानाचा सातत्याने अवमान करत आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणं घेणं नाही. सरकारला शेतकरी केवळ निवडणुकीपुरता पाहिजे असतो. निवडणूक संपली की शेतकऱ्याला ते फेकून देतात. केवळ शेतकऱ्याच्या नावावरती शेतकरी मेळाव्या घेणारे राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे शेतकऱ्यांच्या उरावर बसलेला भुजंग आहे. त्याला समूळ उखडून टाकण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते जननायक नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, तसेच  दिनांक 24 जुलै रोजी महाराष्ट्रातील चक्काजाम आंदोलन यशस्वी करावे. असे जाहीर आवाहन शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाउंडेशन, शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी राज्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी शेतकरी कष्टकरी कास्तकर कामगार यांना  केले आहे अशी माहिती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष, संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण  नायकुडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना  सांगितली.

विठ्ठल राजे पवार यांनी शेतकऱ्यांना जाहीर आव्हान करत 24 जुलैला सकाळी दहा वाजल्यापासून राज्यातल्या ठीक ठिकाणी तालुका स्तरावरील गाव , तालुका, विभागीय , जिल्हास्तरावर मोठ्या संख्येने रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करत सरकारची झोप उडवावी, राज्यातले सरकार, पणन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सह कृषिमंत्री हे जंगली रमित गुंतलेले आहेत त्यांना यापुढे जंगलात पाठवण्याचं आव्हान संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केले आहे.

24 जुलै चे आंदोलन इतके यशस्वी करा की पशुधनासह शेळ्या मेंढ्या कोंबड्या सर्व कुटुंबासह बैलगाड्या ट्रॅक्टर्स घेऊन रस्त्यावरती उतरून राज्यातल्या सरकारला शेतकऱ्यांनी एकजूटीची ताकद दाखवावी आणि आंदोलनाचे जननायक नामदार बच्चू कडू यांच्या पाठीशी शेतकरी कष्टकरी कास्तकार कामगार वेट बिगारी अंध अपंग लेप्रसी महिला पुरुष नागरिकांनी खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान विठ्ठल राजे पवार यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष काशिनाथ जाधव, जगन्नाथ कोरडे पाटील, प्रदेशाध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, बाळासाहेब वर्पे, अनिल भांडवलकर,  रवि उर्फ राणा प्रेमजीतसिंह राजे पवार, प्रदेश उपाध्यक्ष, संपर्क व प्रसिद्धी प्रमुख भाग्यवंत ल. नायकुडे, बाळासाहेब मगर, दत्ता पोंदे , गिरीश शिंदे, पंढरीनाथ कोतकर, दौलत गंणगे पाटील श्रीकांत नलवडे, गणपती यादव विलास कदम पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या