मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा प्रहार परिवाराचा सरकारला कडू इशारा

 


💢 मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा प्रहार परिवाराचा सरकारला कडू इशारा

⚧' पुण्यासह राज्यात 575 ठिकाणी चक्काजाम आंदोलन यशस्वी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 26/7/2025 : "मोजरीतील अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन त्यानंतर सात दिवसाची चुलगव्हाण पर्यंतची पदयात्रा, आणि 24 जुलै च्या चक्काजाम आंदोलन या तीन इशाऱ्यानंतरही सरकार वटणीवर येत नसेल तर 2 आक्टोंबरला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विविध 17 मागण्यांसाठी मंत्रालयात घुसून आंदोलन केले जाईल. ती अशी वेळ भाजपा सरकारने येऊ देऊ नये. असा इशारा शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी जाहीरपणे दिला. पुणे शहरात  गौरव जाधव, विठ्ठल राजे पवार यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन शिवाजीनगर आणि लकडी पूल कर्वे रोड चौक येथे शेतकरी कष्टकरी कामगार प्रहार दिव्यांग संघटना परिवाराच्या वतीने सकाळी नऊ ते बारा अडीच ते ३ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यावेळी राजे बोलत होते अशी माहिती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष, संपर्क व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी सांगितली.


२०२० नंतरच्या तिसऱ्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदाच शेतकऱ्यांचं आंदोलन इतक्या जोरदार संख्येने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन झालं ते थेट भारत देशाच्या राष्ट्रपती कार्यालयापर्यंत धडकले, त्याचा परिणाम इतका भयंकर झाला की दिल्ली ते गल्ली भाजपा सरकार अक्षरशा गुडघ्यावर आले आहे, राज्यात शेतकरी कष्टकरी कामगार संघटना, प्रहार, दिव्यांगांसह २०० हून अधिक संघटना आणि प्रत्येक गावातील शेतकरी कष्टकरी कामगार दिव्यांग २४ जुलै च्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनात ५७५ हून अधिक ठिकाणी संपूर्ण प्रहार परिवार सहभागी झाले आहेत, २४,जुलै २०२५ च्या छत्रपती संभाजी नगर येथील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू यांचा सरकारला कडू इशारा दिला की वेळप्रसंगी मंत्रालयात घुसून आंदोलन करू, शेतकरी कर्जमुक्तीचा इतर १७ मागण्यांच्या संदर्भात सरकार सातत्याने टाळाटाळ करत आहे, कर्जमुक्ती देंगे पर तारीख नही बतायेंगे असे सरकारकडून वाचाळ व लग्न केल्या जात आहेत त्यामुळे कडू यांनी आज सरकारला कडू  इशारा  दिला आहे, पुढील होणारे आंदोलन मंत्रालयात घुसून केले जाईल असा इशारा दिला आहे.

यावेळी डेक्कन येथील छत्रपती संभाजी राजांच्या पुतळ्यास शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, प्रहार परिवाराचे प्रदेश समन्वयक गौरव जाधव यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला.  चक्काजाम आंदोलनामुळे पुणे शहरांमध्ये अनेक ठिकाणी  पुणे शहरातल्या ट्रॅफिक, चाकरमान्यांची आणि पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र राज्यात साडेतीनशे हून अधिक ठिकाणी चक्काजाम आंदोलनामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार संघटना, प्रहार परिवारां सह शेतकरी कर्जमुक्ती सह 17 मागण्यांच्या साठीचे आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकार आणि कृषिमंत्री अक्षरशः  गुडघ्यावर, रम्मी गेम मंत्री राजीनामा द्या, तरी आज जुगारी सरकारचं करायचं काय, भ्रष्टाचारी मंत्री सरकारचा राजीनामा घ्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिलीच पाहिजे अशा घोषणांनी प्रहार परिवार, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाने पुणे शहर दणानून सोडले.!

यावेळी डेक्कन शिवाजीनगर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. चक्काजाम आंदोलनाच्या नंतर शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, गौरव जाधव प्रहार राज्य समन्वयक, पुणे शहर जिल्हा अध्यक्ष अनिल भांडवलकर, प्रहार पुणे शहर नयन पुजारी, शेतकरी संघटनेचे डॉक्टर राजू चौधरी, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष यशवंत बांगर, विष्णुपंत पाटील,‌ दत्तात्रय भोसले, नौशाद शेख, सचिन ओवाळ, शिवाजी गायकवाड, संगीता जोशी, सुनंदा बामणे, भाग्यश्री मोरे, राजेंद्र जोगदंड, शेतकरी संघटना व प्रहार परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले. डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनच्या पीआय निंबाळकर  व पुणे शहराचे डेक्कन विभागाचे पोलीस उपयुक्त यांनी हे निवेदन स्वीकारले असल्याची माहिती विठ्ठल राजे पवार यांनी यावेळी पत्रकारांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह उसाच्या पिकाला ४४००/- रुपये प्रति टन तर गाईच्या दुधाला प्रति लिटर ४८/- रुपये, म्हशीच्या दुधाला ५८/- रुपये तर कांदा २४१० रुपये प्रति क्विंटल बेस रेट सह शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोथिंबीर मेथीसह सर्व,च प्रकारच्या शेतमालाला बेसरेट  गॅरेंटी हमीभाव सरकारने जाहीर करावा अशी मागणी केली यांस एकूण 17 मागण्या यामध्ये आहेत. दिव्यांगांना मोफत घरे, सहा हजार रुपये पेन्शन, मेंढपाळांच संरक्षण अशा अनेक मागण्या त्या निवेदनामध्ये केलेल्या आहेत, अशी माहिती शेतकरी व प्रहार परिवाराच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या