🔰 मनाची शुद्धता

 

🔰 मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 26/7/2025 : आज २६ जुलै, कारगिल विजय दिवस! पाकिस्तानने भारतावर छद्माने लादलेले युद्ध आपण फार मोठी किंमत देऊन जिंकले. या युद्धात एकूण ५२७ सैनिकांनी आपले प्राण गमावले तर १३६३ सैनिक सामान्य ते गंभीररीत्या जखमी झाले.

कितीही आधुनिक प्रकारची शस्त्रास्त्रे किंवा युद्धसाधने जरी वापरली गेली तरी शेवटी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन आपल्या देशाच्या सीमा अखंड ठेवणाऱ्या जवानांच्या असीम त्यागाची तुलना करणे कलात्रयी शक्य नाही.

सामान्य नोकरदार व्यक्तींच्या तुलनेत सैनिकांना मिळणारे वेतन आणि इतर फायदे जरी वरवर दिसत असले तरी यात अंतर्भूत असणाऱ्या प्राणांतिक धोक्याच्या समोर काहीच नाहीत.

आजचा संकल्प

_आपले सर्वस्व पणाला लावत देशसेवेसाठी आपल्या व कुटुंबियांच्या सुखाची होळी करणारे सर्व सैनिक बंधू आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याला सदैव आदरस्थानिच असले पाहिजेत!_

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या