🟩 मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/07/2025 :
"संघर्ष" हा प्रत्येकाला कोणत्या कोणत्या स्वरूपाचा करावाच लागतो. बोलणे,चालणे, धावणे, लिहिणे, वाचणे या गोष्टी शिकण्याची सुरुवात म्हणजे ते प्राप्त करण्यासाठी केलेला संघर्षच असतो.
जसजसे वयाने, ज्ञानाने, मानाने मोठे होत जातो तसतसे संघर्षाचे स्वरूप बदलत जाते. परिस्थितीवर मात करण्यासाठी, आहे हे पद टिकवून ठेवण्यासाठी, अधिक काही मिळवण्यासाठी तो करावाच लागतो.
मात्र संघर्ष प्रामाणिकपणे, नीतिमत्तेची सीमा न ओलांडता करावा. त्यासाठी पद, पैसा, प्रतिष्ठा याचा गैरवापर कधीच करू नये. त्यासाठी शॉर्टकट शोधून, दुसऱ्याला वेठीस धरून नये. असे केल्यास त्यातून गुन्हेगारीचा जन्म होतो.
आजचा संकल्प
स्वतःच्या क्षमता, बुद्धिमत्ता, बुद्धीचचातुर्य यांचा योग्य वापर करून, नीतिमत्तेच्या चौकटीत राहून कणखरपणे जीवनातील संघर्षाला सामोरे जाऊ व यशस्वी जीवन जगण्याचा प्रयत्न करू.
सौ. स्नेहलता स. जगताप._
0 टिप्पण्या