💢 विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/7/2025 :
आज कारगिल विजय दिवस! पाकिस्तानने कपटाने बळकावलेली आपली मातृभूमी, आपल्या वीर सैनिकांनी प्राणपणाने लढून माघारी मिळवली. आपल्या या वीरांच्या पराक्रमाचे, बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस.
उंच शिखरांवर बसलेला शत्रू, त्याच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांपासून बचावासाठी कोणताही आडोसा नाही, ४० ते ४५ अंशाची खडी चढण, या आणि अशा अनेक विपरीत बाजू असताना देखील आपल्या सैन्याने मिळवलेला हा विजय दैदिप्यमान आहे.
आपल्या सैनिकांच्या कर्तृत्वाचे त्यांच्या त्यागाचे केवळ विशेष दिवशी स्मरण न करता, सदैव त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल, बलिदानाबद्दल कृतज्ञ राहू.
जयहिंद !🇮🇳
सौ.स्नेहलता स. जगताप
0 टिप्पण्या