सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजमाता रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांची जयंती संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/7/2025 :
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकर नगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजमाता रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली.
महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते राजमाता रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे समन्वयक पोपट भोसले-पाटील व वरिष्ठ लिपिक मिनाक्षी राऊत यांनी रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करुन दिला.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी राजमाता रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या कार्याची माहिती दिली आणि अकलूज सारख्या परिसराचे नंदनवन व सर्व शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यास त्यांनी जे योगदान दिले ते अविस्मरणीय आहे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे, महाविद्यालयाचे समन्वयक, कार्यालयीन अधीक्षक, सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. भारती चंदनकर यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहीले.
0 टिप्पण्या