💢 आ.रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का?

 


💢 आ.रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 29/7/2025 :

सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक, शेतीविषयक प्रश्न जणू संपलेच असून फक्त आ. रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का ? हाच सगळ्यात मोठा प्रश्न काही लोकांसमोर उरलेला आहे..!कारण आजकाल भाजपचा कोणताही मंत्री जिल्ह्यात आला, की ठराविक पत्रकारांचा फक्त एकच प्रश्न "आ. रणजितसिंह मोहिते-पाटलांवर कारवाई कधी होणार?"बावनकुळे आले एकच प्रश्न, महाजन दोनदा आले तरी एकच प्रश्न, आ. रणजितसिंह मोहिते-पाटलांवर भाजप कारवाई कधी करणार? काही पत्रकारांच्या पिवळ्या दृष्टीकोनातून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे, कष्टकरी दिन दुबळ्याचे सामाजिक प्रश्न संपलेत. विठ्ठलाच्या दरबारात देखील कुणाच्यातरी सांगण्यावरून राजकीय प्रश्न विचारणे काय ते राजकारण..!

सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या तीन टाळक्यांमुळे जिल्ह्यातील भाजपची राजकीय घडी विस्कटली. यांच्यामुळे सोलापूर  जिल्ह्यात भाजपचा बट्याबोळ झाला. मतदारांना नको असताना देखील बाहेरच्या लोकांना खासदार आमदार करण्याचा अट्टहास  पक्षाच्या अंगलट आला, लोकसभेत दारुण पराभव झाला,विधानसभेला पक्षाला उतरतीकळा लागली

दहा चे पाच आमदार झाले.या गोष्टीतून ही धडा न घेता जिल्ह्यात भाजपच्या आमदारांवर विश्वास न दाखवता बाहेरचा पालकमंत्री केला याला काय म्हणायचे?

सध्या  लायकी नसलेल्या,ताकद नसलेल्या काही लोकांचा हे तीन बाहेरची टाळके पक्ष प्रवेश घडवून आणत आहेत, व जे भाजपचे काम करताहेत ते जिल्ह्यात प्रभाव असणारे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वर कधी कारवाई करणार म्हणून पत्रकारांना प्रश्न विचारायला लावणारे कीती विरोधाभास करत आहेत..

सोलापूर जिल्ह्यात सुकाळ पडलाय, सोन्याचा धूर निघत आहे,जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे.शेतकरी सुटा बुटात फिरत आहे. जगण्याची चिंता नाही प्रजा सुखी आहे आणि काही पत्रकारांच्या दृष्टीने फक्त एकच प्रश्न उरला आहे भाजप आ.रणजितसिंह मोहिते-पाटलांवर कारवाई कधी करणार? खरतर पत्रकारांनी  जिल्ह्यात पिक विमा रखडलाय, विकास कामे ठप्प झालेत,यावर प्रश्न विचारायला हवेत .किंवा राजकीय प्रश्न विचारायचा तर डोळसपणे विचारायला हवा जिल्ह्यात भाजपची बिकट अवस्था का झाली? त्याची कारणे काय आहेत? परीस्थितीत सुधारणेसाठी काय करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या