🟢 मेंढपाळांना चराईसाठी वनक्षेत्र खुले व चराई पास मोफत देण्याचा निर्णय.

🟢 मेंढपाळांना चराईसाठी वनक्षेत्र खुले व चराई पास मोफत देण्याचा निर्णय. 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 04/07/2025 :           

अभयारण्य व राखीव जंगलात प्रवेश बंदी असताना मेंढपाळांना संपूर्ण जंगलातच चराईसाठी प्रवेश दिला जात नाही. तसेच  पाच फुटापेक्षा उंच असणाऱ्या झाडांना मेंढ्या पासून धोका नसल्याने असे वनक्षेत्र चराईसाठी खुले करावे.अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मेंढपाळ समितीचे सदस्य संजय वाघमोडे यांनी समिती बैठकीत  केल्यानंतर  मंत्री गणेश नाईक यांनी यावर तात्काळ निर्णय घेऊन मेंढपाळांना झाडांची उंची पाच फुटापेक्षा जास्त असणारे वन क्षेत्र मेंढ्या चराईसाठी खुले करून मेंढपाळांना चराई पास मोफत देण्याची घोषणा बैठकीत केली. 

मेंढपाळांच्या चराई व इतर समस्या बाबत शासन निर्णय गठीत समितीची वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक गुरुवारी (दि ३ )मंत्रालयात पार पडली . 

 मेंढपाळ समितीच्या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण, अल्प संख्यांक विभाग मंत्री  दत्ता मामा भरणे, आदिवासी विकास मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, आमदार गोपीचंद पडळकर,  माजी खा. विकास महात्मे, यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव  मिलिंद  म्हैसकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी. एन, वनविकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक संजीवजी गौड तसेच मेंढपाळ समितीचे सदस्य संतोष महात्मे, रामभाऊ शिंगाडे, रमेश नवल सरक, श्रीमती शारदाताई पांढरे, संजय कन्नावार,  अनंत बनसोडे, संदीप जगनार उपस्थित होते.

आ. गोपीचंद पडळकर यांनी बोगस वनहक्क दावे दाखल करून हडप केलेल्या जमीनी वनविभागाने ताब्यात घेऊन मेंढपाळांना चराईसाठी खुल्या कराव्यात. यावरही चर्चा करून   याबाबत ही आठ दिवसात निर्णय घेणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले. चंद्रपूर वाशीम जिल्ह्यातील मेंढपाळासाठी जिल्हा नियोजन मधुन पायलट प्रोजेक्ट राबविला जात आहे. (तंबू, वाघर इत्यादी साहित्य) तो संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याबाबत चर्चा

अर्ध बंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी वनविभागाने जागा उपलब्ध करून द्यावी. 

पशुसंवर्धन मार्फत मेंढपाळांना रोग प्रतिबंधक लस तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या