सुरज शिवाजी वाघंबरे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 03/07/2025 :
संग्रामनगर - अकलूज (तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) येथील सुरज शिवाजी वाघंबरे (वय 35 वर्षे) यांचे बुधवार दिनांक 2 जुलै 2025 रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने ठाणे मुंबई येथे निधन झाले. कामानिमित्त हल्ली त्यांचे वास्तव्य ठाणे येथे होते. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुली, आई, वडील, बहिणी असा परिवार आहे.
भारतीय बहुजन महासंघाचे माळशिरस तालुका युवक माजी अध्यक्ष सुरज वाघंबरे यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अकलूज मधील अकलाई स्मशानभूमीत अंतिम दहा संस्कार करण्यात आले. शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळी तिसऱ्याचा विधी होणार आहे.
"सुरज वाघंबरे यांचे निधन दुःखद आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे माळशिरस (जि. सोलापूर)चे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जोमाने काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता अशी सुरज यांची ओळख होती. अत्यंत कमी वयात त्यांचे जाणे वेदनादायक आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर कुटुंबियांच्यावतीने सुरज वाघंबरे यांना भावपूर्ण आदरांजली!"
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
0 टिप्पण्या