श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान

 श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अन्नदान

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 29/06/2025 : माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे  मार्गदर्शक  संचालक  जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून व संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, सभापती सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली   शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वैष्णवांना सोमवार दिनांक ३० जून २०२५ रोजी दुपारी ठीक 3:30 वाजता भाकरी, पिठलं, ठेचा, लोणचं, कांदा असे अस्सल ग्रामीण अन्नदानाचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. अकलूज सराटी महामार्गावर अकलूज हद्दीत अन्नदान वाटप करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या