"समाजातील पिडित वंचितांच्या व्यथा वेदना कलावंतांनी आपल्या कलेतून मांडाव्यात" - साहित्यिक व्याख्याते-सुभाष सोनवणे
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/06/2025 :
समाजातील पिडित वंचितांच्या व्यथा वेदना कलावंतांनी आपल्या कलेतून मांडाव्यात" म्हणजे प्रस्तापितांना व सरकारला जाग येईल. कलावंतांनी आपली कला जोपासून तिचा वारसा पुढे चालू ठेवावा. जेणे करून नवोदित कलावंतांना त्याचा खूप फायदा होईल. त्यांना एक दिशा मिळेल. असे मत साहित्यिक, व्याख्याते सुभाष सोनवणे यांनी व्यक्त केले. दि. २२जुन २०२५ रोजी शिर्डी येथील हॉटेल साई एस के पॅलेस हॉलमध्ये कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन तसेच कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट महर्षि दादासाहेब फाळके यांच्या जयंती निम्मित्तानेचित्रपट क्षेत्रातील विविध कलावंतांना व साहित्यिकांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले तेव्हा ते व्यासपीठावरून बोलत होते.
यावेळी सुनील मोंढे यांच्या स्वागत अध्यक्षतेखाली शिर्डीत सिने क्षेत्रात कार्य करणार्या २२ कलावंतांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा देवमाणुस ह्या मराठी मालिकेतील सिनेअभिनेत्री पुष्पा चौधरी ह्या आपल्या भाषणात म्हणाल्या की, कलावंतांचा सन्मान साईच्या नगरीत होणे ही खुप स्तुत्य व गौरवास्पद बाब आहे. या वेळी मा. नगरध्यक्षा जयश्रीताई थोरात, साहित्यिक सुभाष सोनवणे ह्या मान्यवरांच्या हस्ते दिग्दर्शक प्रकाश जाधव, प्रा.पंडीत भारुड,अभिनेञी दिपाली कुलकर्णी,अभिनेता प्रमोद पंडीत,मिलींद जाधव,अंबादास धुळे, साहित्यिक व्याख्याते सुभाष सोनवणे,दिग्दर्शक अल्ताफ शेख,प्रशांत बोगम,अभिनेता राजेंद्र केदारे,महादेव साळोखे,मंगला जाधव,निर्माते अमित काकडे,कवी अहमद शेख, गीतकार राजु शाहणे, अभिनेत्री पुष्पा चौधरी,गायक विजय गोखले बालकलावंत देवश्री बावनथडे,सौदर्य लोमटे,गायिका विजया जाधव,नाट्यकलावंत सुप्रिया वानखेडे, वैजयंती सिन्नरकर आदी २२ कलाकारांना चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी गझलकार राम गायकवाड , सिनेकलावंत काळूराम ढोबळे पुणे, सुनिल गोंदकर, रवी गोंदकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पुरस्कार वितरण सोहळ्याची प्रस्तावना व पाहुण्याचे स्वागत सुनील मोंढे यांनी केले तसेच सुत्रसंचालन श्रीकृष्ण वैजयंती सिन्नरकर यांनी करुन आभार कर्मयोगी आबासाहेब सिनेमाचे लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनी केले. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर शिंदे पाटील, जयश्री कोरे, ज्ञानेश्र्वर साबळे,निलम शिंदे आदींनी परीश्रम घेतले.
0 टिप्पण्या